एक्स्प्लोर
मुंबईतील हिंदू कॉलनीत 85 लाखांच्या नव्या नोटा जप्त

मुंबई : मुंबईच्या दादरमधील हिंदू कॉलनीमध्ये 85 लाख रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मुंबई क्राईम ब्रान्चने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी एकूण सात जणांना अटक करण्यात आली असून एक इनोव्हा कारही ताब्यात घेतली आहे. याच इनोव्हा गाडीत ही रक्कम नेली जात होती. यामागे नोटा बदलणारं मोठं रॅकेट आहे. काळा पैसा पांढरा करण्याचं काम हे रॅकेट करत होतं. इनोव्हामधून 1 कोटींची रक्कम नेली जात असल्याची टीप क्राईम ब्रान्चला मिळाली होती. मात्र त्यापैकी 85 लाखांची रक्कम सापडली. उर्वरित रक्कमेचा शोध सुरु आहे.तसंच अटक केलेल्या सातही जणांची चौकशी सुरु आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
राजकारण
निवडणूक























