Mumbai Covid-19 Vaccination : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या लस न घेतलेल्यांची, महापालिकेचा नवा अहवाल
Mumbai Covid-19 Vaccination : मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्याचवेळी, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) नागरिकांना पुन्हा एकदा लसीकरणासाठी आवाहन करत आहे.
Mumbai Covid-19 Vaccination : मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्याचवेळी, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) नागरिकांना पुन्हा एकदा लसीकरणासाठी आवाहन करत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या जिनोम सिक्वेन्सिंग रिपोर्टमध्ये असे समोर आले आहे की, ज्या रुग्णांनी लसीकरण केले नाही. त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कोविडच्या मृत्यूपेक्षा अधिक आहे.
मुंबईत लसीकरणाशिवाय रुग्णांचा मृत्यू कोविडपेक्षा अधिक; BMC चा रिपोर्ट
मुंबईतील 269 रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी घेण्यात आले होते, त्यापैकी 107 किंवा 39.7 टक्के लसीकरण झाले नव्हते. पाच जणांना अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करावे लागले आणि त्यातील तिघांना जीव गमवावा लागला. दुसरीकडे, लसीचा एकच डोस घेतलेल्या आठ रुग्णांचा आणि पूर्णपणे लसीकरण झालेल्या 154 रुग्णांपैकी एकाही रुग्णाचा कोविडमुळे मृत्यू झाला नाही.
पूर्णपणे लसीकरण झालेले रुग्ण आयसीयूमध्ये कमी दाखल
एवढेच नाही तर एकच डोस आणि पूर्ण लसीकरण झालेल्या रुग्णांसाठी आयसीयूमध्ये उपचारांची कमी गरज होती. लसीचे दोन्ही डोस मिळालेल्या फक्त एका रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल करावे लागले.
काय म्हणाले बीएमसीचे कार्यकारी आरोग्य अधिकारी?
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बीएमसीच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, “जीनोम-सिक्वेंसिंग अहवालात, लसीकरण न केलेल्या रूग्णांमध्ये संसर्गाची तीव्रता खूप जास्त असल्याचे दिसले. रुग्णांच्या या गटाला बरे होण्यासाठी आणखी वेळ हवा होता. विशेषत: कॉमोरबिडीटी असलेल्या वृद्धांसाठी पुन्हा लसीकरणाची गरज अधोरेखित करत आहे,
मुंबईत गेल्या 24 तासांत 1 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले
सोमवारी राज्यात एकूण 2 हजार 369 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1 हजार 62 नवीन रुग्णसंख्या एकट्या मुंबईत नोंदवण्यात आली आहेत. त्याच वेळी, राज्याच्या राजधानीत आणखी पाच मृत्यूची नोंद झाली असून, 27 जूनपर्यंत एकूण मृतांची संख्या 37 झाली आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक 2369 नव्या रुग्णांची नोंद, 1062 रुग्ण कोरोनामुक्त
महाराष्ट्रात सोमवारी 2369 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर सोमवारी दिवसभरात एकूण 1402 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत आज सर्वाधिक म्हणजे 1062 रुग्णांची भर पडली आहे. गेल्या 24 तासांत पाच कोरोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 77 लाख 91 हजार 555 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत.