एक्स्प्लोर
चुलतभावाला जिवंत जाळलं, मुंबईत आरोपीला अटक
दोघा भावांमध्ये मालमत्तेच्या वादातून काही दिवसांपासून खटके उडत असल्याची माहिती आहे.
मुंबई : मालमत्तेच्या वादातून एका तरुणाने आपल्या चुलतभावालाच जिवंत जाळलं. यामध्ये सुनील काटेले या 40 वर्षीय व्यक्तीचा जळून मृत्यू झाला. मुंबईतल्या गोरेगावमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मयत सुनील गोरेगावच्या आदिवासी पाड्यामध्ये राहत होते. 27 तारखेला सुनील घराच्या बाल्कनीत झोपले होते. त्यावेळी रात्री दहाच्या सुमारास आरोपी संतोष काटलेने सुनिल यांच्या अंगावर पेट्रोल टाकलं आणि आग लावून जिवंत जाळलं.
आगीत सुनील काटेले 90 टक्के भाजले. त्यांना सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी याप्रकरणी संतोषला अटक केली आहे. आरोपी संतोष हा सुनील यांचा चुलतभाऊ आहे. दोघांमध्ये मालमत्तेच्या वादातून काही दिवसांपासून खटके उडत असल्याची माहिती आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement