एक्स्प्लोर
मुंबईतल्या पदपथांवरून आई-वडिलांना चालवण्याचं धाडस होत नाही: अजोय मेहता
मुंबई: मुंबईतील फुटपाथची अवस्था भीषण आहे. याची कबुली खुद्द मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनीच दिली आहे. 'फुटपाथच्या बिकट अवस्थेमुळं माझ्या वृद्ध आईवडिलांना बाहेर फिरायला न्यायला भीती वाटते.' असं म्हणत त्यांनी आपली हतबलता व्यक्त केली.
'माझ्या वॉर्ड ऑफिसरला मी सांगतो की एकदा तुमच्या आई वडिलांना फुटपाथवरुन चालायला घेऊन जा आणि मग मला सांगा फुटपाथची काय अवस्था आहे.' असंही आयुक्त मेहता उद्गविनपणे म्हणाले.
'मुंबईतील फुटपाथची अवस्था भयंकर आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळे करणार आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार. वेळ पडल्यास कडक कारवाई करु.' असंही मेहता म्हणाले. दरम्यान, रस्तेकामांचं डेब्रिजही फुटपाथवर टाकायला मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान, याविषयी बोलताना शिवसेना नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी आयुक्तांवरच निशाणा साधला आहे. आयुक्तांकडे अधिकार आहेत. असं म्हणत त्यांनी आयुक्तांच्याच कोर्टात चेंडू टोलवला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
जळगाव
Advertisement