Mumbai Corona Cases : मुंबईत गेल्या 24 तासात 1057 रुग्णांची नोंद, तर 1312 रुग्णांची कोरोनावर मात
मुंबई गेल्या 24 तासात 21 हजार 947 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली, त्यापैकी 1057 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
मुंबई : मुंबईत मागील 24 तासात 1,057 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 1312 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत मुंबई 6 लाख 53 हजार 998 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट 93 टक्क्यांवर आला आहे तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 334 दिवसांवर गेला आहे.
मुंबई गेल्या 24 तासात 21 हजार 947 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली, त्यापैकी 1057 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईत सध्या 28 हजदार 86 अॅक्टिव रुग्ण आहेत. आज मुंबईत 48 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत मुंबई 14 हजार 671 रुग्णांनी जीव गमावला आहे.
मुंबईत मास्क न घालणाऱ्यांकडून 55 कोटींचा दंड वसूल
कोरोना काळात सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्यांकडून 23 मे पर्यंत मुंबई महापालिकेने 55 कोटी 56 लाख 21 हजार 800 रुपये दंड वसूल केला आहे. त्यात मुंबई पोलिस आणि रेल्वेने वसूल केलेल्या दंडाचा समावेश आहे. महानगरपालिकेअंतर्गत 23 मे पर्यंत अधिकाऱ्यांनी 48 कोटी 28 लाख 80 हजार 800 रुपये दंड वसूल केला आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या गस्ती दरम्यान 6 कोटी 77 लाख 01 हजार 800 रुपये दंड वसूल केला आहे. कोविड प्रकरणात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणून रेल्वेला मानले जाते. रेल्वेने देखील 50 लाख 39 हजार 200 रुपये दंड वसूल केला आहे.
राज्यात 22,122 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात आज 42,320 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 22,122 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 361 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहेत. दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. राज्यात आज एकूण 3,24,580 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत एकूण 51,82,592 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.51 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 361 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.59 टक्के एवढा आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- मान्सूनपूर्वी सर्व मुलांना इन्फ्लूएन्झा लस द्यावी; कोविड आणि पीडियाट्रिक टास्कफोर्सचा महाराष्ट्र सरकारला सल्ला
- Covid 19 Third Wave : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका नाही, एम्सच्या संचालकांचा दावा
- मोठा दिलासा...! आज राज्यातील एकूण 16 शहर आणि जिल्ह्यात कोरोनामुळं एकही मृत्यू नाही
- कोरोना वॅक्सिन सर्टिफिकेटवर पंतप्रधान मोदींचा फोटो हटवून छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या फोटो; सरकार म्हणतं, 'ज्यांचे पैसे, त्यांचाच फोटो'
Before You Go
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?





















