Mumbai Corona Update : मुंबईकरांना दिलासा; कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 500 दिवसांवर; आजपासून लसीकरण पूर्ववत
Mumbai Corona Update : देशासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आणि मुंबईचा दैनंदिन आकडा अगदी आठ ते दहा हजारांवर जाऊन पोहोचला. पण आता या आकड्यात घट होऊन मुंबईचा दैनंदिन कोरोना रुग्णवाढीचा आकडा हजारांच्या आत आला आहे. मुंबईचा रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल 500 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. मुंबईतला रुग्णवाढीचा दरही 0.13 टक्क्यांपर्यंत खाली आलेला आहे.
Mumbai Corona Update : देशासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख उतरणीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरीही राज्यातील लॉकडाऊन 15 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या लॉकडाऊनदरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथीलता देण्यात येणार असल्याचं शासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
मुंबईचा रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल 500 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. मुंबईतला रुग्णवाढीचा दरही 0.13 टक्क्यांपर्यंत खाली आलेला आहे. लस तुटवड्यामुळे काल दिवसभर बंद असलेलं मुंबईतील लसीकरण आज पुन्हा सुरु झालं आहे. मुंबई महापालिकेला कोरोना लसीचे 93 हजार डोस मिळाले आहेत. मुंबईतील महापालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर काल (3 जून) लसीकरण बंद राहणार आहे. मुंबई महापालिकाने याबाबत ट्वीट करुन माहिती दिली होती. परंतु, आता आजपासून लसीकरण पूर्ववत करण्यात आलं आहे. तसेच यासंदर्भातील माहिती महापालिकेनं ट्वीट करत दिली आहे.
देशासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आणि मुंबईचा दैनंदिन आकडा अगदी आठ ते दहा हजारांवर जाऊन पोहोचला. पण आता या आकड्यात घट होऊन मुंबईचा दैनंदिन कोरोना रुग्णवाढीचा आकडा हजारांच्या आत आला आहे. त्याचप्रमाणे रुग्णदरवाढीचा दर 6 ते 8 टक्क्यांपर्यंत गेला होता, तो दर आता 0.13 टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. त्याचप्रमाणे मुंबईचा पॉझिटिव्हिटी दरही साधरणतः 3 ते 4 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. रुग्ण वाढीचा दर कमी झालेला आणि रुग्ण दुपट्टीचा कालावधीही वाढला आहे.
मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढीत मोठी घट
मुंबईत गेल्या 24 तासांत 961 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 897 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 6,75,193 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा आता 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णसंख्या सध्या 16,612 इतकी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 500 दिवसांवर पोहोचला आहे.
धारावीमध्ये फक्त एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची नोंद
काल (गुरुवारी) धारावीमध्ये फक्त एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची नोंद झाली आहे. याबाबत मुंबई महानगरपालिकेनं माहिती दिली आहे. धारावीत सध्या एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 19 असल्याचं बीएमसीकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेने घातलेले निर्बंध आणि उपाययोजनांमुळं धारावीसारख्या हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी आज केवळ एका रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत आजवर एकूण 6829 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज दादरमध्ये 6 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. दादरमध्ये आतापर्यंत 9466 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर आज माहिममध्ये 17 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. माहिममध्ये आतापर्यंत 9802 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.