Mumbai Corona Update : मुंबईत शुक्रवारी 290 रुग्णांची नोंद, 298 कोरोनामुक्त
Mumbai Corona Update : बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी मुंबईत 290 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. आज मुंबईत 290 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शुक्रवारी 298 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,02,760 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 648 झाली आहे. सध्या मुंबईत 1,797 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 290 रुग्णांमध्ये 267 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 3090 दिवसांवर गेला आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 29, 2022
29th July, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/Td1ER0VcmQ
सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 1794 सक्रिय रुग्ण आहेत. तर पुण्यात 4405 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 791 सक्रिय रुग्ण आहेत. पालघर 172, रायगड 259, रत्नागिरी 44, सिंधुदुर्ग 84, सातारा 190, सांगली 234, कोल्हापूर 147, सोलापूर 65, नाशिक 572, अहमदनगर 459, जळगाव 53, धुळे 89, औरंगाबाद 280, जालना 103, बीड 62, लातूर 185, परभणी 43, हिंगोली 39, नांदेड 44, उस्मानाबाद 237, अमरावती 153, अकोला 68, वाशिम 167, बुलढाणा 106, यवतमाळ 105, नागपूर 1634, वर्धा 84, भंडारा 254, गोंदिया 66, गडचिरोली 58 आणि चंद्रपूरमध्ये 105 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 13186 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात 1997 कोरोना रुग्णांची नोंद
राज्यात आज 1997 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2470 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
संबंधित बातम्या
Coronavirus : कोरोनाबाधितांसह मृत्यूची संख्या किंचित घटली, धोका मात्र कायम
Maharashtra : महाराष्ट्रात कोरोनानंतर स्वाईन फ्लूचा वाढता धोका; मुंबईत सर्वाधिक रूग्ण