(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Corona Update : मुंबईत मंगळवारी 102 कोरोना रूग्णांची नोंद, एकही मृत्यू नाही
Mumbai Corona Update : महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईत 102 कोरोना रूग्णांची नोंद झाली. तर आज एकाही रूग्णाच्या मृत्यूची नोंद नाही.
Mumbai Corona Update : मुंबईत मंगळवारी 102 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर आज एकाही रूग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत चढ-उतार होत आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईत 102 कोरोना रूग्णांची नोंद झाली. मुंबईत सध्या कोरोनाचे 549 सक्रीय रूग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत 1, 039, 322 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबईतील कोरोनाचा रिकव्हरी रेट 98 टक्के झाला आहे. दरम्यान, राज्यात सर्वात जास्त कोरोनाचे रूग्ण मुंबईत आहेत. आज राज्यात 153 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 102 हे मुंबईतील आहेत. ठाण्यात आज तीन रूग्णांची नोंद झाली आहे. तर नवी मुंबईत आज सात नवीन कोरोना रूग्ण आढळले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,28, 297 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे.
गेल्या 24 तासात देशात 2 हजार 380 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
देशात कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 2 हजार 380 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 56 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. काल देशात 2 हजार 67 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती तर 40 रुग्णांचा मृत्यू झाला होती. आज या रुग्णसंख्येत किंचीत वाढ झाली आहे. दरम्यान, देशात आत्तापर्यंत 4 कोटी 30 लाख 49 हजार 974 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत कोरोनामुळे 5 लाख 22 हजार 062 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तस सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 13 हजार 433 आहे. गेल्या 24 तासांत 1,093 सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णांच्या बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.76 टक्के आहे.