एक्स्प्लोर
Advertisement
वरिष्ठ पोलिसाच्या मुलाचा विनयभंग, मुंबईत हवालदाराला अटक
कॉन्स्टेबल प्रमोद ठोंबरे यांनी तक्रारदार तरुणाला कपडे काढण्यास सांगितलं आणि त्याला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे
मुंबई : ठाणे पोलिसातील सहाय्यक उपनिरीक्षकाच्या 15 वर्षीय मुलाचा विनयभंग केल्याप्रकरणी 50 वर्षीय कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील काळबादेवी रहदारी विभागात कार्यरत असलेले कॉन्स्टेबल प्रमोद ठोंबरे यांच्यावर मुलुंड पोलिसांनी कारवाई केली.
ठोंबरे मुलुंडमधील एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहतात. त्यांनी रविवारी, 31 मार्चला एका मुलीला तळमजल्यावर राहत असलेल्या तक्रारदार तरुणाकडे पाठवलं आणि आपल्या घरी बोलावून घेतलं.
दहावीत शिकणारा संबंधित मुलगा ठोंबरेंच्या घरी आला. त्यांनी तरुणासोबत परीक्षा, पुढील शिक्षणाविषयीची योजना अशा विषयांवर गप्पा मारण्यास सुरुवात केली. तरुणाने आपल्याला नेव्हीत भरती होण्याची इच्छा असल्याचं सांगताच, आपण तुला टिप्स देऊ असंही ठोंबरेंनी सुचवलं.
त्यानंतर ठोंबरेंनी तरुणाला कपडे काढण्यास सांगितले आणि त्याला अयोग्य पद्धतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली. भेदरलेल्या तरुणाने आपण घराचा दरवाजा नीट लावला नसल्याचं सांगत पळ काढला. तरुणाने हा प्रकार आपल्या आईच्या कानावर घातला. तिने पतीला याची माहिती दिल्यावर मुलुंड पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला.
कॉन्स्टेबल ठोंबरे यांच्याविरोधात पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement