एक्स्प्लोर

Women's Reservation Bill : केंद्र सरकारचे महिला आरक्षण विधेयक हा आणखी एक जुमला; काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांची टीका

Women's Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक हा एक भाजपचा निवडणूक जुमला असल्याची टीका मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी महिला आरक्षण विधेयक मंजूर केले आहे. मात्र या नव्या विधेयकानुसार महिलांना 33 टक्के आरक्षण (Womens Reservation Bill) मिळण्यासाठी आणखी काही वर्ष लागणार आहेत. त्यामुळे हे विधेयक एक जुमला असल्याची टीका मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड (Congress MLA Varsha Gaikwad) यांनी केली आहे. 

महिला आरक्षण विधेयकानुसार जनगणना झाल्यानंतर होणाऱ्या परिसीमन प्रक्रियेनंतरच हे महिला आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे या सरकारने देशातली सर्व महिलांची फसवणूक केली आहे, असा आरोपही आमदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. 

युपीएच्या काळात 2010 मध्ये महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर झालं होतं. भाजपची नियत तेवढी स्वच्छ असती, तर त्यांनी हेच विधेयक लोकसभेत मंजूर करून घेतलं असतं. पण तसं न करता भाजपने श्रेय लाटण्यासाठी एक नवीनच विधेयक आणलं आहे. या विधेयकात काही शर्ती नमूद केल्या आहेत. या शर्तींमुळे विधेयक मंजूर होऊनही त्याचा फायदा महिलांना मिळायला किमान पाच ते सहा वर्षे उलटतील, असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटले. नमूद केलं.

जनगणना झालीच नाही तर डीलिमिटेशन कसं होणार?

या विधेयकात परिसीमनाची म्हणजेच डीलिमिटेशनची अट आहे. एखाद्या मतदारसंघात किंवा सभागृहात सीमांकन किंवा मर्यादा निश्चित करण्यासाठीची ही प्रक्रिया असते. त्यासाठी जनगणना अत्यंत आवश्यक असते. जनगणनेतील विविध घटकांच्या प्रमाणाच्या आधारवर हे सीमांकन किंवा परिसीमन केलं जातं. भारतात 2021 मध्ये जनगणना होणं अपेक्षित होतं. पण त्या वेळी कोरोना असल्याने ती झाली नाही. अद्याप या जनगणनेची प्रक्रियादेखील सुरू झाली नाही. भारतासारख्या आकाराने मोठ्या देशात ही प्रक्रिया राबवण्यासाठी किमान दोन ते तीन वर्षांपेक्षा जास्त काळ लागतो. त्यानंतर येणाऱ्या आकडेवारीनुसार सीमांकन प्रक्रिया होईल. त्यासाठीही आणखी दोन ते तीन वर्षे लागतील. त्यामुळे 2029 च्या आधी महिला आरक्षण मिळणं अशक्य आहे, असा मुद्दा आमदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला.

भाजप सरकारकडून खोटी आमिषं

सत्तेवर आल्यापासूनच या सरकारने फक्त खोटी आमीषं दाखवली आहेत. दर वेळी या सत्ताधाऱ्यांच्या भूलथापा उघड्या पडल्या आहेत. तरीही या सरकारला लाज वाटत नाही. ही देशातल्या सगळ्या महिलांची फसवणूक आहे. महिलांना त्यांचा न्याय्य हक्क देण्याची अजिबात इच्छा नसल्याने फक्त निवडणुकांच्या तोंडावर आणखी एक जुमलेबाजी करण्याचा हा प्रकार असल्याचे आमदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कॅन्सरग्रस्त 70 वर्षीय शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल गेल्या 23 दिवसांपासून फक्त पाण्यावर, शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची भीती
कॅन्सरग्रस्त 70 वर्षीय शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल गेल्या 23 दिवसांपासून फक्त पाण्यावर, शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची भीती
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची नांदी, विलासराव देशमुखांचा पुत्र मुख्य प्रतोद, प्रदेशाध्यक्ष पदासाठी 5 जण शर्यतीत
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची नांदी, विलासराव देशमुखांच्या मुलाला मोठी जबाबदारी, प्रदेशाध्यक्षपदी कोण?
PM Kisan Samman Yojana:मोठी बातमी, शेतकऱ्यांना पीएम किसानद्वारे 12 हजार मिळणार? संसदीय समितीची शिफारस, अंतिम निर्णय कधी? 
मोठी बातमी, शेतकऱ्यांना पीएम किसानद्वारे 12 हजार मिळणार? संसदीय समितीची शिफारस 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi : एकनाथ शिंदे, अजित पवारांचे पक्ष राहतील की नाही अशी शंका - राऊतChhagan Bhujbal Nashik : शक्तिप्रदर्शन करत भुजबळ काय भूमिका घेतात याकडे लक्षMaharashtra Cabinet Portfolio :  मंत्रिमंडळाचं खातेवाटप दुपारी 12 वाजेपर्यंत होणारABP Majha Headlines :  9 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कॅन्सरग्रस्त 70 वर्षीय शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल गेल्या 23 दिवसांपासून फक्त पाण्यावर, शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची भीती
कॅन्सरग्रस्त 70 वर्षीय शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल गेल्या 23 दिवसांपासून फक्त पाण्यावर, शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची भीती
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची नांदी, विलासराव देशमुखांचा पुत्र मुख्य प्रतोद, प्रदेशाध्यक्ष पदासाठी 5 जण शर्यतीत
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची नांदी, विलासराव देशमुखांच्या मुलाला मोठी जबाबदारी, प्रदेशाध्यक्षपदी कोण?
PM Kisan Samman Yojana:मोठी बातमी, शेतकऱ्यांना पीएम किसानद्वारे 12 हजार मिळणार? संसदीय समितीची शिफारस, अंतिम निर्णय कधी? 
मोठी बातमी, शेतकऱ्यांना पीएम किसानद्वारे 12 हजार मिळणार? संसदीय समितीची शिफारस 
IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
IPO: पैसे तयार ठेवा, 1600 कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना मोठी संधी
Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? देवेंद्र फडणवीसांविषयीच्या ममत्त्वभावामुळे चर्चांना उधाण
छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? देवेंद्र फडणवीसांविषयीच्या ममत्त्वभावामुळे चर्चांना उधाण
Embed widget