एक्स्प्लोर
मुंबई काँग्रेसला एक अध्यक्ष आणि दोन कार्याध्यक्ष मिळण्याची शक्यता
येत्या दोन दिवसात मुंबई काँग्रेसबाबत निर्णय होण्याची शक्यता प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा तोडगा निघाला असला तरी, मुंबई काँग्रेसला अजून वाली सापडेना, असं चित्र आहे. महाराष्ट्र काँग्रेसप्रमाणे मुंबई काँग्रेसमध्येही एक अध्यक्ष आणि दोन कार्याध्यक्षांची नेमणूक होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यात मिलिंद देवरा यांच्याकडे मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद कायम राहिल तर एकनाथ गायकवाड आणि हुसैन दलवाई यांना कार्याध्यक्षपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ गायकवाड दलित तर हुसेन दलवाई मुस्लिम असा जातीय-सामाजिक विचार करत कार्याध्यक्षांची नेमणूक होण्याची शक्यता आहे. दरम्यान येत्या दोन दिवसात मुंबई काँग्रेसबाबत निर्णय होण्याची शक्यता प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे नेतृत्व बदल करण्यात आले. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली. एका अध्यक्षासह पाच कार्यकारी अध्यक्षांचीदेखील नियुक्ती करण्यात आली. डॉ. नितीन राऊत, डॉ. बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुजफ्फर हुसेन या पाच जणांची कार्याध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती. कार्याध्यक्ष नेमणूक करताना पक्षाने प्रादेशिक संतुलन आणि जातीय समीकरणांचा विचार केल्याचे दिसून येत आहे. नितीन राऊत, यशोमती ठाकूर हे विदर्भातील नेते आहेत, विश्वजीत कदम पश्चिम महाराष्ट्रातील आहेत, तर बसवराज पाटील मराठवाड्यातील नेते आहेत. महाराष्ट्र काँग्रेसमधील नियुक्त्या बाळासाहेब थोरात - रणनीती समिती, अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण - जाहीरनामा समिती, अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे - समन्वय समिती, अध्यक्ष नाना पटोले - प्रचार समिती, अध्यक्ष रत्नाकर महाजन - प्रसिद्धी आणि प्रकाशन समिती, अध्यक्ष
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























