एक्स्प्लोर
मुंबई पालिकेत विरोधी पक्षनेता न देणं ही, सेना-भाजपची खेळी: काँग्रेस

मुंबई: मुंबई महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. महापालिका अधिनियमानुसार दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष विरोधी पक्ष असतो. मात्र, भाजपनं विरोधी पक्षनेता पद स्वीकारण्यास नकार दिल्यामुळं काँग्रेसन विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा केला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपनं शिवसेनेला मदत केली आहे. त्यामुळं प्रशासनानं विरोधी पक्षनेतेपद आम्हाला द्यावं अशी मागणी काँग्रेसकडून केली जाते आहे. तसेच विरोधी पक्षनेतेपद पालिकेला न देणं ही सेना-भाजपची खेळी असल्याचा आरोप काँग्रेस गटनेते रवी राजा यांनी केला आहे. 8 मार्चला मुंबई महापालिकेच्या महापौरांची निवड झाली. त्यावेळी भाजपनं शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केलं. त्यामुळे आता काँग्रेस विरोधी पक्षनेते पदासाठी आक्रमक झाली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप आता नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं आहे. महापालिकेतील पक्षीय बलाबल कसं आहे?
- शिवसेना – 84 + 4 अपक्ष
- भाजप – 82
- काँग्रेस – 31
- राष्ट्रवादी – 9
- मनसे – 7
- MIM – 3
- सपा – 6
- अखिल भारतीय सेना – 1
आणखी वाचा























