एक्स्प्लोर
पेपर चेकिंगसाठी मुंबईतील कॉलेजेस आणखी चार दिवस बंद
31 जुलैपर्यंत मुंबई विद्यापीठाचे पेपर तपासायचे असल्यामुळे आणखी चार दिवस महाविद्यालयं बंद ठेवण्यात येणार आहेत.
मुंबई : 31 जुलैपर्यंत निकाल लावण्याचं आव्हान खांद्यावर घेतलेल्या मुंबई विद्यापीठाकडून इतर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान सुरुच आहे. पेपर तपासण्यासाठी आणखी चार दिवस महाविद्यालयं बंद ठेवण्यात येणार आहेत.
उत्तर पत्रिका तपासण्याच्या कामात प्राध्यापक व्यस्त राहणार असल्यामुळे 31 जुलैपर्यंत मुंबईतील कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठानं घेतला आहे. त्यामुळे पुढचे 4 दिवस कॉमर्स, आर्ट्स आणि लॉच्या विद्यार्थ्यांना घरीच बसावं लागणार आहे.
मुंबईच्या 2 लाख उत्तरपत्रिका नागपुरात, तासाला 13 पेपर तपासावे लागणार!
यापूर्वी सोमवार ते गुरुवार म्हणजे 27 जुलैपर्यंत महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली होती. त्यात आणखी चार दिवसांची भर पडल्यामुळे आता आठ दिवस लेक्चर्स बंद ठेवण्याची वेळ आली आहे. 31 जुलैपूर्वीच मुंबई विद्यापीठाचे निकाल, तावडेंचं आश्वासन मुंबई विद्यापीठात 4 हजार 582 शिक्षकांनी 1 लाख 4 हजार 128 उत्तरपत्रिका तपासणीचं काम पूर्ण केलं आहे. 31 जुलैपर्यंत विद्यापीठाला आणखी 4 लाख उत्तरपत्रिका तपासाव्या लागणार आहेत. राज्यपालांच्या निर्देशानुसार 31 जुलैपूर्वीच निकाल लावण्याचं आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी दिलं होतं. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ न देण्याची हमीसुद्धा तावडेंनी दिली होती.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement