एक्स्प्लोर

विमानतळ परिसरातील आठ इमारतींवर महिन्याभरात हातोडा पडणार, जिल्हाधिकाऱ्यांकडून हायकोर्टात अहवाल सादर

Mumbai Airport : निर्धारीत उंचीचे नियम मोडणाऱ्यांवरील कारवाईची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून हायकोर्टात सादर करण्यात आला आहे. मात्र 48 पैकी तीन इमारती प्रशासनाला अद्याप सापडलेल्या नाहीत.

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) परिसरात उंचीची मर्यादा मोडणाऱ्या आठ इमारतींवर महिन्याभरात कारवाई करणार अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हायकोर्टात देण्यात आली आहे. उल्लंघन आढळलेल्या 48 पैकी 22 इमारतींवरील नियमानुसार बेकायदेशीर ठरवलेलं बांधकाम आधीच तोडून टाकलं आहे. तर 15 इमारतींबाबत योग्य ते तपशील अद्याप मिळाले नसून त्याची जमावाजमव सुरू असून तीन इमारती अद्याप सापडल्या नसल्याची कबूली देण्यात आली आहे.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सभोवताली नियमांचं उल्लंघन करून उभ्या असलेल्या 48 इमारतींवर हातोडा पडणार हे निश्चित झालं आहे. या इमारतींवर पाडकामाची कारवाई कशी करणार? त्याबाबतचा अहवाल दिलेल्या निर्देशांनुसार मुंबई उपनगर जिल्ह्याधिकारी निधी चौधरी यांनी नुकताच हायकोर्टात सादर केला आहे. 

मुंबई विमानतळाच्या रन वे फनेलमध्ये उंचीची मर्यादा न पाळताच अनेक विकासकांनी टोलेजंग इमारती बांधल्या आहेत. या इमारतींमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे, विमानांचं टेक ऑफ आणि लँडिंग करताना जर एखाद्या दिवशी अनुचित घटना घडली तर मोठी जीवितहानी होऊ शकते असा दावा करत अँड. यशवंत शेनॉय यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनीच कारवाई करणे अपेक्षित 

विमानतळ परिसरातील उंचीच्या दृष्टीने धोकादायक असलेल्या इमारतींची दर 15 दिवसांनी पाहणी होते. साल 2010 च्या पाहणीत आढळून आलेल्या 137 धोकादायक इमारतींच्या 63 प्रकरणांमध्ये अंतिम आदेश पारित करण्यात आले आहेत. त्यापैकी नऊ प्रकरणांमध्ये अपील दाखल झालं असून सहा इमारतींनी नियमांची पूर्तता केलेली आहे. मात्र उर्वरित 48 बांधकामं तात्काळ पाडणे आवश्यक असल्याची माहिती मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडनं (एमआयएएल) न्यायालयाला दिली. जिल्हाधिकाऱ्यांना या इमारतींची साल 2017 मध्येच माहिती दिली असल्याचं ‘एमआयएएल’नं न्यायालयात सांगितलं. तेव्हा मुंबई पालिकेला या इमारतींवर कारवाईचे आदेशही देण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. मात्र कायद्यानुसार ज्या टोलेजंग इमारतींचे वरचे मजले हवाई वाहतुकीत अडथळा ठरणार आहेत, त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनीच कारवाई करणे अपेक्षित आहे. त्याची जबाबदारी मुंबई पालिकेवर ढकलणं चुकीचं असल्याचं हायकोर्टानं राज्य सरकारला सुनावलं होतं.

त्यामुळे विमानतळ परिसरातील या 48 इमारतींवर हातोडा पडणार हे आता निश्चित झालेलं आहे. यासाठी मुंबई पालिका आणि अन्य प्राधिकरणांची मदत घेण्यास न्यायालयानं प्रशासनाला निर्देश दिले आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आलेल्या इमारतींची वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याची सूचनाही हायकोर्टानं यावेळी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Sharad Pawar : 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरेUddhav Thackeray : बाळासाहेबांचा जिव्हाळा असलेल्या शहरात झालेला गद्दाराचा विजय खटकलाUddhav Thackeray on Amit Shah : अमित शाहांना नवरत्न तेल द्या; बुद्धी तल्लख होईल - उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Sharad Pawar : 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
Dilip Walse Patil: 'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
×
Embed widget