एक्स्प्लोर
Advertisement
मनोरा आमदार निवासात सतीश पाटलांच्या खोलीत छत कोसळलं
मुंबईतील मनोरा आमदार निवासात आमदार सतीश पाटील यांच्या रुममधील सीलिंग कोसळल्याची माहिती आहे.
मुंबई : मुंबईतील मनोरा आमदार निवासातील खोलीत छत कोसळल्याची घटना समोर आली आहे. आमदार सतीश पाटील यांच्या रुममधील सीलिंग कोसळल्याची माहिती आहे.
आमदार सतीश पाटील हे मनोरा आमदार निवासातील रुम नंबर डी 125 मध्ये राहतात. अँटी चेंबरमधील पीओपीसहित छत कोसळलं. सतीश पाटील हे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल-पारोळामधील राष्ट्रवादीचे आमदार आहेत.
मनोरा आमदार निवास लवकरच पाडणार
छत कोसळलं त्यावेळी रुममध्ये कोणीही उपस्थित नव्हतं. खोली उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दक्षिण मुंबई परिसरात आमदारांचं हक्काचं निवासस्थान म्हणून मनोरा आमदार निवास ओळखलं जातं. सुमारे 20 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या इमारतीचा दर्जा खराब असल्याचा अहवाल इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये साधारण वर्षभरापूर्वी देण्यात आला होता. त्यानुसार ही इमारत धोकादायक असल्याचं पुढे आलं होतं. यापूर्वीही आमदार निवासातील एका खोलीत छत कोसळलं होतं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement