एक्स्प्लोर

महिला डॉक्टर असल्याने दोषी मुंबईकर ड्रायव्हरला शिक्षेत सूट

मुंबई : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरुनही दोषी वाहनचालकाला शिक्षेत सूट देण्यात आली आहे. व्यवसाय आणि लिंग (जेंडर) याच्या आधारावर मुंबईतील मरिन ड्राईव्हमधील महिला स्पीच थेरपिस्टला शिक्षेत सवलत मिळाली आहे. लज्जा शाह या डॉक्टर महिलेने तिच्या इनोव्हा कारने एका बाईकला धडक दिली होती. अपघातात 25 वर्षीय दुचाकीस्वार ज्योती सिंगचा कारखाली चिरडल्याने मृत्यू झाला, तर बाईक चालवणारा तिचा 22 वर्षीय भाऊ आकाश जखमी झाला होता. 25 मे 2015 रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटीजवळ हा अपघात घडला. डॉ. लज्जा शाह ही एचएन रिलायन्स फाऊण्डेशन हॉस्पिटलमध्ये स्पीच थेरपिस्ट म्हणून कार्यरत आहे. दोषी आढळलेल्या वाहनचालकाला केवळ ती महिला आणि डॉक्टर असल्याच्या कारणावरुन शिक्षेत सूट देण्यात आली आहे. दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद असतानाही महानगर दंडाधिकाऱ्यांनी तिला केवळ 72 हजारांच्या दंड बजावला. 'दोषी ही महिला आणि डॉक्टर असल्याने तिला तुरुंगवास ठोठावण्याऐवजी दंड आकारणं योग्य आहे' असं मत दंडाधिकारी व्हीआर दसारी यांनी व्यक्त केलं. डॉ. लज्जावर कलम 279 (भरधाव वाहन चालवणे), 304 अ (निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरणे), 337 (इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणारे कृत्य) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. डॉ. लज्जाला पोलिस कोठडीही झाली नाही. कलम 304 अंतर्गत दोन वर्षांपर्यंत शिक्षा, दंड किंवा दोन्हीची तरतूद आहे. आकाश आणि ज्योती ऑफिसला जाण्याच्या घाईत होते. त्यामुळे त्यांनी धोकादायक कट मारल्याचा युक्तिवाद शाह यांच्या वकिलाने केला. मात्र रस्त्यावरील इनोव्हाच्या टायरचे मार्क्स पाहता, कार भरधाव असल्याचं दंडाधिकाऱ्यांनी सांगितलं. अपघाताच्या वेळी डॉ. शाह यांच्या गाडीत उपस्थित असलेला त्यांचा डॉक्टर आणि आकाश यांच्यासह सात जणांची साक्ष घेण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget