Mumbai Building Collapse Live Updates: कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातून 16 जणांना वाचवले; तिघांचा मृत्यू
Mumbai Building Collapse Live Updates: मुंबईतील कुर्लाभागात रात्री 11.30 च्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. मदत आणि बचाव कार्य सुरू असून ढिगाऱ्याखाली 20-25 लोक अडकले असण्याची शक्यता आहे,
LIVE
Background
Mumbai Building Collapse Live Updates: मुंबईतील कुर्ला येथील नाईक नगर परिसरातील चार मजली इमारत कोसळली आहे. सोमवारी, रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली असून ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ढिगाऱ्याखाली 20-25 लोक अडकले असण्याची शक्यता आहे, आतापर्यंत 4 ते 5 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे.
राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबईचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, ढिगाऱ्याखालून 5 जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घटनास्थळी भेट दिली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या चारही इमारतींना मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस दिली होती. तरीही काही लोक तिथे राहत होते. असे असतानाही त्यात 8 ते 10 कुटुंबे राहत होती. वास्तव्य करणारे रहिवासी भाडेकरू आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी बचाव कार्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई महापालिकेने नोटीस बजावलेल्या इमारतींमध्ये वास्तव्य करू नये असे आवाहन करण्यात येत आहे.
Mumbai Building Collapse : कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातून 16 जणांना वाचवले; तिघांचा मृत्यू
Mumbai Building Collapse : कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातून 16 जणांना वाचवण्यात यश मिळाले आहे. तर, दुसरीकडे या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्यात अजूनही आठ जण अडकल्याची माहिती आहे.
Mumbai Building Collapse: इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, 9 जखमींना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज; मुंबई महापालिकेची माहिती
Mumbai Building Collapse: कुर्ला नेहरूनगर इमारत दुर्घटनेत एकाचा मृत्यू; अग्निशमन दलाची माहिती
Mumbai Building Collapse: कुर्ला नेहरूनगर इमारत दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Mumbai Building Collapse : कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजून दहा ते बारा लोक अडकल्याची भीती
Mumbai Building Collapse : कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजून दहा ते बारा लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगाऱ्यातील नागरिकांच्या सुटकेसाठी श्वान पथकही दाखल झाले आहे.
Mumbai Building Collapse : कुर्ला येथील दुर्घटना स्थळी एनडीआरएफचे दोन पथक दाखल
Mumbai Building Collapse : कुर्ला येथील दुर्घटना स्थळी एनडीआरएफचे दोन पथक दाखल झाले आहेत. त्यामुळे आता मदत आणि बचाव कार्यात वेग येणार आहे.