एक्स्प्लोर
Advertisement
एक हत्या 'पचवल्याने' तरुणाला मुंबईकर वृद्धांच्या हत्येची हिंमत
वांद्र्यात राहणाऱ्या मखिजानी दाम्पत्याची गेल्या आठवड्यात मोलकरणीने बॉयफ्रेण्डच्या मदतीने हत्या केली होती.
मुंबई : लिव्ह इन पार्टनरची हत्या यशस्वीरित्या पचवल्यामुळे मुंबईतील वृद्ध दाम्पत्याला जीवे मारण्याची हिंमत तरुणाला आली. वांद्र्यात राहणाऱ्या मखिजानी दाम्पत्याची गेल्या आठवड्यात मोलकरणीने बॉयफ्रेण्डच्या मदतीने हत्या केली होती.
20 वर्षांची पार्वती खाखा केवळ 15 दिवसांपूर्वी मखिजानी दाम्पत्याकडे मोलकरीण म्हणून नोकरीला लागली होती. कमी कालावधीतच गोड बोलून तिने 85 वर्षीय नानक मखिजानी आणि 81 वर्षीय दया मखिजानी यांचा विश्वास संपादन केला.
पार्वतीने 26 वर्षीय बॉयफ्रेण्ड सिंघासन मुकुट एक्काच्या मदतीने 20 जून रोजी मखिजानी दाम्पत्याचा जीव घेतला. सिंघासनने ओदिशातील आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या करुन पळ काढला होता. हा खून पचवल्यामुळे यावेळीही आपली सुटका होईल, या विचाराने मखिजानी दाम्पत्याची हत्या करण्याची हिंमत दोघांमध्ये आली.
मुंबईत दरोड्याच्या उद्देशाने वृद्ध दाम्पत्याच्या हत्येचा संशय
खार पोलिसांच्या तपासात सिंघासनचा गुन्हेगारी इतिहास समोर आला आहे. पार्वती सिंघासनच्या प्रेमात आकंठ बुडाली असून तिने आपल्या बॉयफ्रेण्डची सुटका करण्याची विनंतीही पोलिसांना केली. आपण एकटीनेच हा गुन्हा केल्याची कबुली तिने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुरावे पाहता पोलिसांना हे हत्याकांड एकट्या पार्वतीने केल्याची शक्यता कमी वाटते.
मखिजानी दाम्पत्याची हत्या झाल्याचं 21 तारखेला सकाळी उघड झालं होतं. घरातील दुसरी कामवाली सुट्टीवर असल्यामुळे पार्वतीने 20 तारखेला एक्काला मुंबईत बोलवून घेतलं. घटना उघडकीस आली, त्याच संध्याकाळी पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या होत्या.
गीतांजली एक्स्प्रेसने ओदिशाला पळून जाण्याच्या प्रयत्नान असलेल्या पार्वती आणि सिंघासनला पोलिसांनी नागपुरात बेड्या ठोकल्या होत्या. दोघांकडून 10 लाख रुपये किमतीचे दागिने आणि 9 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
Advertisement