एक्स्प्लोर

मुंबई मनपा शाळांतून 49 टक्क्यांनी विद्यार्थ्यांची घट : प्रजा फाऊण्डेशन

महापालिकेच्या मराठी शाळांमध्ये दरवर्षाला विद्यार्थीगळतीचं प्रमाण 8% आहे. सेमी इंग्रजी माध्यमातूनही दरवर्षाला 8% विद्यार्थ्यांची गळती होते.

मुंबई : प्रजा फाऊंडेशननं मुंबई महापालिकेच्या शाळांविषयी सादर केलेल्या अहवालातून मराठी शाळांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या नऊ वर्षात मुंबई महापालिकेच्या शाळांमधल्या पहिलीतील विद्यार्थीसंख्येत 49 टक्क्यांनी घट झाली आहे. टॅबसारख्या महत्वाकांक्षी योजना राबवूनही मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबायचं नाव घेत नाही. विशेष म्हणजे मराठी शाळांची परिस्थिती अत्यंत खराब आहे. महापालिकेच्या मराठी शाळांमध्ये दरवर्षाला विद्यार्थीगळतीचं प्रमाण 8% आहे. सेमी इंग्रजी माध्यमातूनही दरवर्षाला 8% विद्यार्थ्यांची गळती होते. मुंबईतल्या 48 टक्के पालकांना आपल्या पाल्याला महापालिका शाळेतलं शिक्षण, त्याचा दर्जा आणि असुविधांमुळे  महापालिकेच्या शाळेत शिकवणं योग्य वाटत नाही. दुसरीकडे, महापालिकेच्या शैक्षणिक बजेटमध्ये मात्र वाढ होताना दिसत आहे. महापालिका प्रतिविद्यार्थी खर्च करत असलेल्या 44 हजारांचा खर्च यावर्षी 52 हजार करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या शाळांचा दर्जा आणि परिस्थिती अशीच राहिली, तर 2021 पर्यंत महापालिकेच्या शाळेत विद्यार्थी दिसणारच नाहीत. महापालिकेचं शैक्षणिक बजेट केवळ शिक्षकांच्या पगारावरच खर्च करावं लागेल, असा निष्कर्ष सद्य परिस्थितीवरुन काढला गेला आहे. यावर प्रतिक्रिया देताना महापौरांनी प्रजा फाऊंडेशनच्या अहवालाबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसंच महापालिका शाळेतील शिक्षणाचा दर्जा तपासण्यासाठी आपण शाळांना अचानक भेट देणार असल्याचंही म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाच्या कंत्राटात चुलत भावानेच पैसे खाल्ले, ओंबळेंच्या मुलीचा आरोप 
शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाच्या कंत्राटात चुलत भावानेच पैसे खाल्ले, ओंबळेंच्या मुलीचा आरोप 
Cabinet Decision : मोठी बातमी! राज्यातील 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत धान्य, 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू वाटप, शासनाचा मोठा निर्णय
राज्यातील 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत धान्य, 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू वाटप, शासनाचा मोठा निर्णय
दुपारी पुण्यात, संध्याकाळी मुंबईत, गोळीबाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला, माहीम परिसरात सोन्याच्या दुकानावर गोळीबार झाल्यानं खळबळ
दुपारी पुण्यात, संध्याकाळी मुंबईत, गोळीबाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला, माहीम परिसरात सोन्याच्या दुकानावर गोळीबार झाल्यानं खळबळ
मोठी बातमी! SIT चं पथक मनोज जरांगे पाटलांच्या घरी दाखल, चौकशी केली जाणार, नेमकं प्रकरण काय? 
मोठी बातमी! SIT चं पथक मनोज जरांगे पाटलांच्या घरी दाखल, चौकशी केली जाणार, नेमकं प्रकरण काय? 

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं, चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं
Donald Trump : अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
Pune Bopdev Accident : पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
Rajasthan : राजस्थानात 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्री भजनलाल शर्मांच्या जिल्ह्यात भाजप उमेदवाराचा पराभव  
राजस्थानमध्ये 37 पैकी 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचा पराभव
Pune Firing Case : दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Pune Crime : मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
Sunetra Pawar on Pune Firing : 'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
Embed widget