एक्स्प्लोर
मुंबई भाजप युवा मोर्चाकडून 92 जागांची मागणी
मुंबई : मुंबई भाजप युवा मोर्चाने मुंबई महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी 92 जागांची मागणी केली आहे. युवा मोर्चाने ईच्छुकांची यादी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे ही यादी सुपूर्द केली आहे.
अनेक आमदार, खासदार पुत्रांच्या मुलांचा या यादीमध्ये समावेश आहे. या यादीत नील सोमय्या, आकाश पुरोहित आणि दीपक ठाकूर यांचीही नावं आहेत. मात्र प्रकाश मेहता यांचे पुत्र हर्ष मेहता यांच्या नावाचा यादीत समावेश करण्यात आलेला नाही.
अनेक उच्च शिक्षीत मुंबई महापालिका निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचंही युवा मोर्चाने म्हटलं आहे. त्यामुळे आता भाजपकडून किती युवा चेहऱ्यांना संधी दिली जाते, याबाबत उत्सुकता लागली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement