एक्स्प्लोर

Mumbai BEST Bus : मुंबईतल्या बेस्ट बसमध्ये मोबाईल, मौल्यवान वस्तू विसरलात...मग इथं साधा संपर्क

Mumbai BEST Bus : मुंबईतील बेस्ट बसमध्ये मोबाईल फोन आणि इतर मौल्यवान वस्तू विसरलेल्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

Mumbai BEST Bus :  मुंबईकरांना प्रवासासाठी रेल्वेनंतर बेस्ट बस (BEST Bus) ही सर्वात किफायतशीर सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय आहे. त्यामुळे बेस्ट बसला मुंबईची दुसरी लाइफलाइन असे म्हणतात. बेस्ट बसमधून प्रवास करताना काहीजण आपल्या वस्तू विसरतात. काहीजण तर मोबाईलदेखील (Mobile Phone) विसरतात. काहींना मोबाईल पुन्हा मिळतात. तर, काही जण मोबाईल पुन्हा मिळवण्याच्या अपेक्षा सोडून देतात. बेस्ट बसमध्ये मोबाईल विसरलेल्या प्रवाशांना बेस्ट प्रशासनाने काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. 

जानेवारी 2023 मध्ये बेस्ट बसमध्ये सापडलेले मोबाईल पुन्हा प्रवाशांना देण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. बेस्ट बसमध्ये जानेवारी 2023 महिन्यात गहाळ झालेल्या व बेस्ट कडे जमा झालेल्या भ्रमणध्वनी संचाची (Mobile phone ) यादी गहाळ वस्तू विभाग, संपर्काची अधिक माहिती  बेस्ट उपक्रमाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. बेस्ट बसमध्ये 30 डिसेंबर 2022 ते 29 जानेवारी 2023 या कालावधीत जवळपास 40 मोबाईल फोन मिळाले आहेत. प्रवाशांनी या मोबाईलवर 15 मार्च 2023 पूर्वी दावे करावेत असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.  

आयफोनचा ही समावेश 

विविध बसमार्गांवर धावणाऱ्या बस गाड्यांमध्ये प्रवाशी मोबाईल विसरले आहेत. यामध्ये आयफोनचाही समावेश आहे. जवळपास तीन आयफोन बेस्टच्या ताब्यात आहे. बस गाड्यांमधील बहुतांशी मोबाईल फोन हे अॅण्ड्राईड फोन आहेत. 

मोबाईल फोनवर दावा करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक

>> मोबाईलवर दावा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे: 

> ओळखपत्र आणि निवासी पत्ता पुरावा उदा. आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इ.

> कॅश मेमो / मोबाईलचे बिल

> सीम कार्ड तपशील

> मोबाईल हरवल्याबाबत पोलीस तक्राराची प्रत

कागदपत्रांची योग्य पडताळणी केल्यानंतरच दावेदाराला मोबाईल दिला जाईल असेही बेस्टने प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

> मौल्यवान वस्तू (म्हणजे सोने, चांदी, मोती, मोती, हिरे)  यावर दावा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

> ओळखपत्र आणि निवासी पत्ता पुरावा (उदा. आधार कार्ड, निवडणूक कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इ.) 

>  पोलीस N.C. / F.I.R. किंवा

> कॅश मेमो / संबंधित वस्तूंचे बिल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये राडा, सुहास कांदेनी नांदगावमध्ये बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी रोखली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये राडा, सुहास कांदेनी नांदगावमध्ये बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी रोखली, नेमकं काय घडलं?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या दोन तासात कोल्हापूर उत्तर अन् कागलमध्ये सर्वाधिक चुरस! किती टक्के मतदान?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या दोन तासात कोल्हापूर उत्तर अन् कागलमध्ये सर्वाधिक चुरस! किती टक्के मतदान?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
Amit Thackeray-Sada Sarvankar: अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Emtiyaz Jaleel :  लोकांचं मतदान कार्ड जमा करून त्यांच्या बोटाला शाई लावली - जलीलChandrashekhar Bawankule : आमच्या कल्याणकारी योजना जनतेला पटल्या आहेत - बावनकुळेRani Lanke Parner : निलेश लंकेंच्या पावलावर पाऊल ठेवून काम करेन - राणी लंकेAkshay Kumar Vote : निवडणूक आयोगाने मतदारांसाठी उत्तम व्यवस्था केली - अक्षय कुमार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये राडा, सुहास कांदेनी नांदगावमध्ये बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी रोखली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये राडा, सुहास कांदेनी नांदगावमध्ये बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी रोखली, नेमकं काय घडलं?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या दोन तासात कोल्हापूर उत्तर अन् कागलमध्ये सर्वाधिक चुरस! किती टक्के मतदान?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या दोन तासात कोल्हापूर उत्तर अन् कागलमध्ये सर्वाधिक चुरस! किती टक्के मतदान?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
Amit Thackeray-Sada Sarvankar: अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
Maharashtra Assembly Election 2024 Voting: शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
Unhappy Leave : तुम्ही खूश नसाल, तर ऑफिसला येऊ नका, सुट्टी घ्या; 'या' कंपनीचं फर्मान
तुम्ही दुःखी असाल, तर ऑफिसला येऊ नका, सुट्टी घ्या; 'या' कंपनीचं फर्मान
Sada Sarvankar vs Amit Thackeray: अर्रर्रर्र... सदा सरवणकर मतदानाला थाटात पोहोचले, पण जॅकेटवर धनुष्यबाणच उलटा लावला
अर्रर्रर्र... सदा सरवणकर मतदानाला थाटात पोहोचले, पण जॅकेटवर धनुष्यबाणच उलटा लावला
Embed widget