एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पूर्वाश्रमीचे शिवसैनिक पुन्हा शिवसेनेत : अनिल परब
मनसेच्या सहा नगरसेवकांना शिवबंधन बांधण्याचं काम अनिल परब यांनी पार पाडलं. शिवसेनेवर आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या भाजप आणि मनसेला अनिल परब यांनी उत्तर दिलं.
मुंबई : पूर्वाश्रमीचे शिवसैनिक पुन्हा एकदा शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत शिवसेना पक्ष आता मजबुतीने उभा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि आमदारअनिल परब यांनी दिली.
मुंबई महापालिकेतील मनसेच्या सात पैकी सहा नगरसेवकांना पक्षात सामील करुन उद्धव ठाकरेंनी एका दगडात दोन पक्षी मारले. या मास्टरस्ट्रोकमुळे मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्याची स्वप्न पाहणाऱ्या भाजपच्या मनसुब्यांना शिवसेनेने सुरुंग लावला.
मनसेच्या सहा नगरसेवकांना शिवबंधन बांधण्याचं काम अनिल परब यांनी पार पाडलं. शिवसेनेवर आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या भाजप आणि मनसेला अनिल परब यांनी उत्तर दिलं.
मी फक्त कायदेशीर स्वरुप दिलं!
"आज कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि मनसेचा एक गट शिवसेनेत विलीन झाला आहे. ज्यांना मूळ पक्षात परत येण्याची इच्छा होती, त्याला मी फक्त कायदेशीर स्वरुप दिलं," असंही परब म्हणाले.
सोमय्यांचं दु:ख समजू शकतो
करोडो रुपये देऊन शिवसेनेने नगरसेवकांना विकत घेतल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. त्यांच्या आरोपांना उत्तर देताना अनिल परब म्हणाले की, "किरीट सोमय्यांची गणितं म्हणजे 'मुंजेरीलाल के हसीन सपने' ह्या म्हणीप्रमाणे आहेत. त्यांचं स्वप्न भंग झालंय, त्यांचं दुःख मी समजू शकतो."
आमचे नगरसेवक पैशांअभावी हरले नसेत
तसंच अनिल परब यांनी भाजप नेते मनोज कोटक यांच्या आरोपांनाही उत्तर दिलं. "आमचे नगरसेवक पैशांअभावी हरले. वडापाव खाऊन काम करणारा शिवसैनिक घोडेबाजार काय करणार? पैसे असते तर ह्यांची सत्ता उलथवून लावायला वेळ लागणार नाही. कोल्ह्याला द्राक्ष आंबट लागतातच," असं परब म्हणाले.
भाजपने कोकण आयुक्तांसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. याविषयी विचारलं असता परब म्हणाले की, "त्यांनी चौकशी करावी, जेणेकरुन वस्तुस्थिती बाहेर येईल."
संबंधित बातम्या :
7 नगरसेवक, 13 आमदार ते मनसेकडे उरलेला एकटा नगरसेवक
पहिल्या मास्टरस्ट्रोकनंतर शिवसेनेची तात्काळ दुसरी खेळी!
शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबत
मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण?
मॉकड्रीलचं कारण देत मुंबई महापालिकेच सर्व दरवाजे बंद!
करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप
दगाफटका योग्य नाही, नगरसेवकांवर राज ठाकरे भडकले
‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान मोठे दावे करणार्यांचे पोट फाडून भाजपचा विजय : आशिष शेलार भांडुप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, सत्ता समीकरणं कशी बदलणार? मुंबई वॉर्ड क्रमांक 116 पोटनिवडणूक : भाजपच्या जागृती पाटील विजयी करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप शिवसेनेला पश्चाताप, जागृती पाटील सेनेत येणार होत्या! फोडाफोडी आणि थैलीशाहीचे राजकारण नेहमीच यशस्वी होत नाही: शिवसेनाअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
ठाणे
जॅाब माझा
जळगाव
Advertisement