Shivsena Vs BJP : अंधेरीत शाळेच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजप आमनेसामने, भाजप आमदार आणि शिंदे गटाच्या खासदाराचा वाद चव्हाट्यावर
Shivsena Vs BJP : अंधेरीतील एका शाळेवर कारवाई करण्याची मागणी भाजप आमदार भारती लव्हेकर यांनी केली आहे. तर त्याच्या विरोधात भूमिका शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी घेतली आहे.
मुंबई: अंधेरी पश्चिमेत वर्सोवामधील एका खाजगी शाळेच्या मुद्द्यावरून भाजप आमदार भारतीय लव्हेकर (Bharati Lavekar) आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) आमने सामने आले आहेत. भाजप आमदार आपल्या पदाचा गैरवापर करत 40 वर्षांपासून सुरू असलेल्या या शाळेवर कारवाई करण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप करत गजानन किर्तीकरांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्रही लिहिलं आहे.
भाजप-शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर
अंधेरी पश्चिमेतील एका खाजगी शाळेने महापालिकेकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या भूखंडावर बांधलेल्या इमारतीला ओसी नसून या शाळेने 30 टक्के मुलांना मोफत शिक्षण दिले नसल्याचा आरोप स्थानिक भाजप आमदार भारती लव्हेकर यांच्याकडून करण्यात आला. मात्र याच मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी आक्रमक भूमिका घेत त्या खाजगी शिक्षण संस्थेला समर्थन देत वरिष्ठांनी त्या आमदाराला समज देण्याविषयीची मागणी देखील केली आहे. यामुळे स्थानिक शिवसेना खासदार आणि भाजपा आमदार आमने-सामने आले असून यामुळे भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
अंधेरी पश्चिमेकडे मागील 40 वर्षापासून एका खाजगी शिक्षण संस्थेने मुंबई महानगरपालिकेकडून वार्षिक 1 रुपया फूट भाड्याने जमीन घेतली. महापालिकेने यावेळी घालून दिलेल्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन करत संस्थेने अनधिकृत बांधकाम केल्याचे माहिती अधिकारातून उघड झाल्याचा दावा भाजपा आमदार भारती लव्हेकर यांनी केला होता. यावर महापालिकेकडून कारवाई देखील करण्यात आली.
गजानन किर्तीकर शाळेच्या समर्थनात
दुसरीकडे सत्ताधारी शिवसेना शिंदे गटातील खासदार गजानन किर्तीकर हे त्या खाजगी शिक्षण संस्थेच्या समर्थनात उतरले. यावेळी गजानन कीर्तीकर यांनी आमदारांनी ज्या पद्धतीने यासंदर्भात पालिका अधिकाऱ्यांवर दबाव आणला आहे त्याला विरोध करण्यासाठी मी येथे CWC मध्ये आलो असून पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
खासदार गजानन किर्तीकर यांच्या म्हणणं आहे की, आमदार भारती लव्हेकर आपला पदाच्या गैरवापर करून पोलीस अधिकाऱ्यांना आणि पालिका कर्मचाऱ्यांना चुकीचं माहिती देऊन शाळेवर कारवाई करण्यासाठी दबाव आणत आहेत. CWC शाळा मागील 40 वर्षांपासून सुरू आहे आणि त्या शाळेत चार हजार विद्यार्थी शिकत आहेत. मात्र त्या शाळा मालकाचा आणि आमदार भारती लव्हेकर यांचा मध्ये वाद झाल्यामुळे आमदार भारती लव्हेकर हे आमदारकीचा गैरवापर करून ही कारवाई करायला लावत आहेत. आमदार भारतीय लव्हेकर यांचा खासदार गजानन कीर्तिकर यांनी कडाडून निषेध केला.
या संदर्भात पालिका कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांवर कारवाई करण्याची मागणीसाठी पत्र आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठवलं असल्याचं खासदार गजानन किर्तीकर यांनी सांगितलं.
ही बातमी वाचा: