एक्स्प्लोर
Advertisement
चेंबूरमध्ये पुलाच्या दुरुस्तीचं काम, वाहतूक कोंडीने मुंबईकर हैराण
मुंबई : मुंबईतील चेंबूरमध्ये आज वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. कारण अमरमहल सिग्नलजवळ असलेल्या पुलाचे बोल्ट निघाल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
LIVE UPDATE:
मुंबईहून ठाण्याच्या दिशेनं जाणारा मार्ग तात्पुरता बंद
अमरमहल पूल बंद करण्यात आल्यानं काही वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी मार्गात काही बदल करण्यात आले आहेत.
- वडाळा फ्रीवे व्हाया छेडा नगर
- सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड व्हाया छेडा नगर
- सुमन नगर - चेंबूर नाका मानखुर्द व्हाया छेडा नगर
- सुमन नगर - चेंबूर नाका गोवंडी व्हाया छेडा नगर
- सायन धारावी एलबीएस मार्ग व्हाया घाटकोपर - अंधेरी लिंक रोड
वाहतूक पोलिसांना शुक्रवारी पुलाचे दोन सांधे निघाल्याचं दिसलं. त्यानंतर उत्तरेच्या दिशेने जाणाऱ्या जड वाहनांची वाहतूक पुलावरुन बंद करण्यात आली. पण शनिवारी सार्वजनिक विभागाच्या अभियंत्यांनी पाहणी केल्यानंतर पुलावरील संपूर्ण वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हा रस्ता मुंबईला ठाणे आणि नाशिकशी जोडतो. शिवाय पूर्व द्रूतगती महामार्गावरील महत्त्वाचा पूल मानला जातो. आता जड वाहनांना पुलावर प्रवेशबंदी असून त्यांना खालचा रस्ता वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पुलावर रविवारी रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. पण आज सकाळीही आठवड्याची सुरुवात वाहतूक कोंडीनेच झाली आहे. तसंच अनेक रस्त्यांच्या क्रॉसिंगवर हा पूल असल्याने इथे वाहनांची तुंबळ गर्दी होण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement