एक्स्प्लोर
महिलांना धक्का दिला तर थेट तुरुंगात रवानगी, पोस्को न्यायालयाचा निर्णय
दोन मुलींचा पाठलाग आणि त्यांना धक्का दिल्याप्रकरणी वडाळ्याच्या 24 वर्षीय सद्दाम शेखला एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
मुंबई : गर्दीच्या ठिकाणी महिलांना वारंवार धक्का देणं आता चांगलंच महागात पडू शकतं आणि तुमची रवानगी थेट तुरुंगात होऊ शकते. महिलेला वारंवार धक्का देणं म्हणजे गुन्हाच आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय विशेष पॉस्को (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस) न्यायालयाने दिला आहे.
दोन मुलींचा पाठलाग आणि त्यांना धक्का दिल्याप्रकरणी वडाळ्याच्या 24 वर्षीय सद्दाम शेखला एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
कोर्टाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचं महिलांनी स्वागत केलं आहे.
काय आहे प्रकरण?
26 ऑगस्ट 2015 रोजी दोन अल्पवयीन मुली संध्याकाळी ट्युशनमधून निघाल्या होत्या. संध्याकाळी सातच्या सुमारास आरोपीने एका पीडितेच्या डाव्या हाताला धक्का दिला. चुकून धक्का लागला असेल म्हणून मुलींनी दुर्लक्ष केलं. मात्र सद्दाम शेखने पाठलाग करुन दुसऱ्या मुलीला धक्का दिला. पुन्हा मुलींनी दुर्लक्ष केलं. तरीही सद्दामने आणखी एक धक्का दिला आणि त्यानंतर मुलींनी आरडाओरडा केला. तो ऐकून लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.
गर्दीचा फायदा घेऊन महिला आणि मुलींची छेड काढण्याचा प्रकार नवीन नाही. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तर असे अनेक प्रकार घडतात. पण आता वारंवार धक्का दिलात तर थेट तुरुंगवास होणार आहे. त्यामुळे छेडछाडीच्या घटनांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement