एक्स्प्लोर

रेल्वे ट्रॅकवर तरुणीचा मृतदेह, मेसेजवरुन आत्महत्येचा संशय

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, पल्लवीने मृत्यूआधी वहिनीला मेसेज केला होता, ज्यात लिहिलं होतं की, "सॉरी, कोणीही जबाबदार नाही."

मुंबई : मुंबईतील करीरोड आणि परळ स्टेशनदरम्यान ट्रॅकवर सापडलेल्या तरुणीच्या मृत्यूचा उलगडा करण्याचं आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे.  पल्लवी विकमसे (वय 20 वर्ष) असं मृत तरुणीचं नाव असून ती लॉची विद्यार्थिनी होती. पल्लवीचा मृत्यू अपघात आणि आत्महत्या याचा पोलिस तपास करत आहेत. पल्लवी ही इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडिया म्हणजेच आयसीएआयचे (ICAI) अध्यक्ष निलेश विकमसे यांची मुलगी आहे. 4 ऑक्टोबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास पल्लवीचा मृतदेह ट्रॅकवर सापडला होता.  ती एका लॉ फर्ममध्ये इंटर्नशिप करत होती. पल्लवीचे कुटुंबीय बुधवारी रात्रभर तिचा शोध घेत होते. पल्लवीचा मृतदेह परळ आणि करीरोड स्टेशनदरम्यानच्या ट्रॅकवर आढळला. पण दुसऱ्या दिवशी गुरुवारी मृत्यूची हकीकत समोर आली तेव्हा कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. पोस्टमॉर्टेमनंतर पल्लवीचा मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आला. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, पल्लवीने मृत्यूआधी वहिनीला मेसेज केला होता, ज्यात लिहिलं होतं की, "सॉरी, कोणीही जबाबदार नाही." रेल्वे ट्रॅकवर तरुणीचा मृतदेह, मेसेजवरुन आत्महत्येचा संशय ज्या ट्रेनमध्ये पल्लवी प्रवास करत होती, ती डोंबिवलीला जाणारी धीमी लोकल होती. शिवाय त्यात फार गर्दीही नव्हती. पल्लवीला ट्रेनमधून पडताना पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शी गीता गायकवाड यांनी सांगितलं की, "पडण्याआधी पल्लवी वारंवार ट्रेनमधून वाकून पाहत होती." देशाचे प्रसिद्ध चार्टर्ड अकाऊंटन्ट फर्म खीमजी कुंवरजी अँड कंपनीने पार्टनर निलेश विकमसे यांची धाकटी मुलगी होती. निलेश विकमसे 35 वर्षांपासून आयसीएआयचे सदस्य आणि विद्यमान अध्यक्ष आहेत. पल्लवी बुधवारी फोर्टमधील एका लॉ फर्म ओआसिस काऊंसलमध्ये इंटर्नशिप करत होती. पल्लवी बुधवारी संध्याकाळी 6 वाजता फोर्टमधील ऑफिसमधून निघाली आणि सीएसटीवरुन ट्रेन पकडली. तोपर्यंत तिचा मोबाईल सुरु होता. 6.30 च्या सुमारास तिने तिच्या वहिनीला "सॉरी, कोणीही जबाबदार नाही," हा मेसेज केला होता. त्यानंतर वहिनी तातडीने तिला कॉल बॅक केला. एकदा रिंग वाजून कॉल कट झाला आणि त्यानंतर फोन स्विच ऑफ झाला. रेल्वे ट्रॅकवर तरुणीचा मृतदेह, मेसेजवरुन आत्महत्येचा संशय रात्री उशिरापर्यंत पल्लवीबाबत कोणतीही माहिती न मिळाल्याने तिच्या कुटुंबीयांनी ऑफिस आणि मित्र-मैत्रिणींना कॉल केला. पण त्यांच्याकडून कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यांनी सोशल मीडियावर पल्लवीचा फोटो आणि माहितीही अपलोड केली होती. एमआरए मार्ग पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली होती. पल्लवीचा मृतदेह बुधवार रात्री 7.30 वाजता ट्रॅकवर सापडला. पण कुटुंबीयांना गुरुवारी पहाटे तिच्या मृत्यूबाबत समजलं. पल्ल्वीने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. तरीही हा अपघात आहे की आत्महत्या याचा पोलिस तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget