एक्स्प्लोर
Advertisement
शाळेत न गेलेल्या मालविकाचं अनोखं यश, अमेरिकेतील MIT मध्ये प्रवेश
मुंबई : मुंबईच्या 17 वर्षांच्या एका मुलीने थेट अमेरिकेच्या प्रसिद्ध मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात एमआयटीत प्रवेश मिळवला आहे. विशेष म्हणजे ही किमया साधणाऱ्या मालविका जोशीने साधं दहावीपर्यंतचं शालेय शिक्षणही पूर्ण केलेलं नाही. कम्प्युटर प्रोग्रॅमिंगमधील कौशल्यामुळे तिला हे यश मिळालं आहे.
पुस्तकी शिक्षण घेण्यापेक्षा मनाला समाधान देणारे शिक्षण घेण्याचा कानमंत्र मालविकाच्या आईने दिला. त्यामुळे मालविकाचं पारशी युथ असेंब्ली या शाळेतून सहावीनंतर नाव काढून घेण्यात आलं. अभ्यासात हुशार असलेल्या मालविकाने शाळा सोडल्यानंतर विविध विषयांचा अभ्यास केला. यानंतर कम्प्युटर प्रोग्रॅमिंगमध्ये तिला आवड निर्माण झाली.
मूळची मुंबईच्या असलेल्या मालविकाने संगणक कोडिंगचा अभ्यास करत प्रतिष्ठित ऑलिम्पियाड परीक्षेत 2 रौप्य आणि 1 ब्राँझ पदक पटकावलं. याच निकषावर अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये मालविकाला प्रवेश मिळाला आहे.
खरंतर दहावीचं प्रमाणपत्र नसलेल्या मालविकाला आयआयटीत प्रवेश मिळणं शक्य नव्हते, कारण इथे बारावी उत्तीर्ण आणि प्रवेश परीक्षांचे नियम आहेत. मात्र ऑलिम्पियाडमधील रौप्य आणि कांस्यपदकामुळे एमआयटीने मालविकाला शिष्यवृत्ती दिली. यामुळे मालविकाला तिच्या आवडत्या विषयात म्हणजेच कम्प्युटर सायन्समध्ये संशोधन करता येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पुणे
रत्नागिरी
क्राईम
Advertisement