एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईत 16 वर्षीय विद्यार्थ्यावर वर्षभरापासून 15 तरुणांचा गँगरेप
2016 मध्ये पीडित विद्यार्थ्यावर त्याच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाने बलात्कार केला. घाबरलेल्या विद्यार्थ्याने या प्रकाराची कुठेही वाच्यता केली नाही. या घटनेचं चित्रण करुन त्याने आपल्या मित्रांना दाखवलं. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन शेजाऱ्यासह त्याच्या मित्रांनी त्याच्यावर सामुहिक बलात्कार करणं सुरुच ठेवलं.
मुंबई : 16 वर्षांच्या मुलावर तब्बल 15 किशोरवयीन मुलांनी गँगरेप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील अंधेरी भागात हे घृणास्पद कृत्य झाल्याची माहिती आहे. गेल्या वर्षभरापासून आपल्यावर अत्याचार होत असल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे. 'मुंबई एक्सप्रेस' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
पोलिसांनी 15 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून सात जणांना अटक केली आहे. पीडित विद्यार्थ्याला
ब्लॅकमेलिंग करुन त्याच्यावर शारीरिक अत्याचार केले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वैद्यकीय तपासणीत पीडित विद्यार्थ्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे.
2016 मध्ये पीडित विद्यार्थ्यावर त्याच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाने बलात्कार केला. घाबरलेल्या विद्यार्थ्याने या प्रकाराची कुठेही वाच्यता केली नाही. या घटनेचं चित्रण करुन त्याने आपल्या मित्रांना दाखवलं. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन शेजाऱ्यासह त्याच्या मित्रांनी त्याच्यावर सामुहिक बलात्कार करणं सुरुच ठेवलं. म्युनिसिपल शाळेच्या पटांगणात आरोपींनी त्याच्यावर आरोपींनी आळीपाळीने बलात्कार केला.
त्यानंतर हॉटेलमध्ये खाण्यासाठी आरोपींपैकी एकाने पीडिताकडे अकराशे रुपयांची मागणी केली. मात्र आपल्याकडे पैसे नसल्याचं सांगताच आरोपींनी 26 जून रोजी त्याला निर्जन स्थळी नेऊन पुन्हा बलात्कार केला. पीडिताच्या तक्रारीनुसार 15 मुलांनी त्याच्यावर चार वेळी बलात्कार केला आहे.
पोलिसांनी 15 ते 17 वर्ष वयोगटातील सात आरोपींना अटक केली असून त्यांची रवानी डोंगरीतील बालसुधारगृहात करण्यात आली आहे, तर इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
राजकारण
Advertisement