एक्स्प्लोर
मुंबईत दहा वर्षांच्या चिमुरड्याकडून नव्या-कोऱ्या कारला आग
मुंबई : मुंबईत दहा वर्षांच्या एका चिमुरड्याने नव्या कोऱ्या कारला आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाकोल्यात कार पेटवणाऱ्या या बालकाची पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. 'मि़ड डे' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
वाकोला परिसरात राहणारे वेलेरियन डिसुझा यांच्या नव्या कोऱ्या गाडीला फटका बसला आहे. या घटनेत गाडीच्या डावीकडील मागच्या भागाचं नुकसान झालं आहे. संबंधित मुलगा कारला आग लावत असतानाचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
सीसीटीव्हीमध्ये अंदाजे 10 वर्षांचा मुलगा कारजवळ येताना दिसतो. त्यानंतर प्लास्टिकची बॅग कारच्या कव्हरला बांधली आणि खिशातून माचिस काढून पेटवून दिली.
गाडीला आग लावून शांतपणे निघाला आणि परिसरात मित्रांसोबत खेळायला लागला. सुदैवाने हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. त्यामुळे हा निव्वळ त्याचा खोडकरपणा होता, की त्याला कोणी आग लावायला सांगितलं, याचा शोध पोलिस घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement