एक्स्प्लोर
मुकेश अंबानींचे पुत्र आकाश आणि श्लोका मेहताचा भव्य विवाह, सेलिब्रेटींची हजेरी
शाहरुख खान, रणबीर कपूर, करण जोहर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी ठुमके लगावले. अमिताभ बच्चन, आमिर खान, प्रियंका चोप्रा, अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय, सचिन तेंडुलकर, झहीर खान यांनी लग्नाला हजेरी लावली होती.
![मुकेश अंबानींचे पुत्र आकाश आणि श्लोका मेहताचा भव्य विवाह, सेलिब्रेटींची हजेरी Mukesh Ambani's son Akash Ambani Shloka Mehta wedding in Mumbai मुकेश अंबानींचे पुत्र आकाश आणि श्लोका मेहताचा भव्य विवाह, सेलिब्रेटींची हजेरी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/03/10092001/Akash-ambani-shloka-mehta-wedding-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा शाही विवाह काल पार पडला. मुंबईतील बीकेसीमधल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये झालेल्या विवाह सोहळ्याला बॉलिवूड, क्रिकेट आणि उद्योग जगतातल्या बड्या सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली होती.
आकाश-श्लोकाच्या लग्नमंडपाला जपानहून मागवलेल्या फुलांची आरास करण्यात आली होती. आकाश आणि श्लोका यांच्या लग्नाचं रिसेप्शन आज होणार आहे.
शाहरुख खान, रणबीर कपूर, करण जोहर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी ठुमके लगावले. अमिताभ बच्चन, आमिर खान, प्रियंका चोप्रा, अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय, सचिन तेंडुलकर, झहीर खान यांनी लग्नाला हजेरी लावली होती.
ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेयर, भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, संयुक्त राष्ट्रसंघाच्या माजी महासचिव बान की मून उपस्थित होत्या. उद्योग विश्वातील गूगलचे सीईओ सुंदर पिचाई, टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा, स्टील किंग लक्ष्मी मित्तलही लग्नाला उपस्थित होते.
श्लोका ही प्रसिद्ध हिरे व्यापारी रसेल मेहता यांची कन्या आहे. आकाश आणि श्लोका बालपणापासूनचे मित्र आहेत. धीरुभाई इंटरनॅशनल स्कूलमध्ये ते एकत्र शिकले होते. गेल्या वर्षी त्यांचा साखरपुडा झाला होता. आकाश आणि श्लोका यांचा विवाहसोहळा देशभरातील बहुचर्चित लग्नांपैकी एक ठरला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)