एक्स्प्लोर
Advertisement
MTNL च्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा मुंबईतील लॉजमध्ये गळफास
ऑफिसमधील सहकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आपल्या पतीने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.
मुंबई : महाराष्ट्र टेलिफोन निगम लिमिटेड अर्थात एमटीएनएलमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मुंबईतील पवईमध्ये असलेल्या लॉजमध्ये 34 वर्षीय संजीव राजोरियांनी जीव दिला. ऑफिसमधील सहकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आपल्या पतीने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.
बुधवारी दुपारी पाऊण वाजताच्या सुमारास राजोरिया यांचा मृतदेह पवईतील एका लॉजमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. संजीव राजोरिया हे अंधेरीतील साकीनाका परिसरात राहायचे.
पवई पोलिसांनी राजोरिया यांचा मोबाईल ताब्यात घेतला असून राहत्या घरी किंवा कार्यालयात सुसाईड नोट आढळते का, याचा तपास पोलिस करत आहेत. सहकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आपल्या पतीने आत्महत्या केल्याची लेखी तक्रार राजोरियांच्या पत्नीने पोलिसांना दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement