MSRTC ST jobs recruitment: मोठी बातमी : STमध्ये मेगाभरती, तब्बल 17450 चालक, सहाय्यक भरणार, 30 हजार रुपये पगार!
MSRTC ST jobs recruitment: राज्यातील तरुणांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. एसटीतील 17 हजार जागांसाठी भरती. उमेदवारांना एसटीकडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे.

MSRTC ST jobs recruitment: भविष्यात येणाऱ्या आठ हजार नवीन बसेससाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने 17,450 चालक व सहाय्यक पदासाठी भरती (ST Recruitment) राबविण्यात येणार असून येत्या 2 ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली. या भरती प्रक्रियेच्या (Job Recruitment) माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण -तरुणींना रोजगार उपलब्ध होणार असून 30 हजार रुपये इतके किमान वेतन त्यांना मिळणार आहे. त्यामुळे या संधीचा पुरेपूर फायदा होतकरू तरुण -तरुणींनी घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 300 व्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक व सहाय्यक मनुष्यबळ भाडेतत्त्वावर (कंत्राटी पद्धतीने) ३ वर्ष कालावधीसाठी घेण्याकरिता ई-निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येत आहे. अर्थात, ही ई-निविदा प्रक्रिया सहा प्रादेशिक विभाग निहाय राबविण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल. कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहाय्यक उमेदवाराला सुमारे ३०,०००/- वेतन देण्यात येणार आहे. याबरोबरच उमेदवारांना एसटीकडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. बसेसची वाढती संख्या त्यासाठी लागणारे हे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित, सुरक्षित व दर्जेदार बससेवा पुरविणे शक्य होईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पोलीस भरतीला मंजुरी देण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया लांबलेली होती, ज्यामुळे उमेदवारांमध्ये मोठी नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर या भरती प्रक्रियेला वेग येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दीर्घकाळ पोलीस भरतीकडे डोळे लावून बसलेल्या अनेक तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आणखी वाचा
मोठी बातमी : अखेर ठरलं, महाराष्ट्रात जम्बो पोलीस भरती, तब्बल 14 हजार पदं भरणार























