एक्स्प्लोर
खड्डे, बेशिस्त डम्परचालकामुळे मुंबईत मायलेकाचा बळी
पूजा घडशी आणि 11 महिन्यांचा समर्थ डम्परच्या चाकाखाली आल्यामुळे दोघांचाही चिरडून मृत्यू झाला.
मुंबई : मुंबईचे खड्डे आणि बेशिस्त डम्परचालकामुळे मुंबईतलं कुटुंब उद्ध्वस्त झालं. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार माय-लेकाला आपला जीव गमवावा लागला.
प्रमोद घडशी पत्नी पूजा आणि 11 महिन्यांच्या बाळासह शनिवारी घाटकोपर मानखुर्द लिंक रोडने दुचाकीवरुन चालले होते. त्यावेळी कचरा वाहून नेणाऱ्या डम्पर चालकाने मागून जोराने हॉर्न वाजवला. हॉर्नच्या आवाजाने प्रमोद दचकले आणि समोरचा खड्डा चुकवण्याच्या नादात त्यांची दुचाकी घसरली.
दुचाकी घसरल्यामुळे प्रमोद, पूजा आणि चिमुकला समर्थ खाली पडले. पूजा आणि समर्थ डम्परच्या चाकाखाली आल्यामुळे दोघांचाही चिरडून मृत्यू झाला. या प्रकरणी देवनार पोलिसांनी डम्पर चालक शम्मी उल्ला रहमत अली शहा याला बेड्या ठोकल्या आहेत.
घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड वर एकीकडे पालिकेच्या उड्डाणपुलाचं काम सुरु आहे, तर दुसरीकडे उरलेला रस्ता संपूर्णपणे खड्डयांनी भरला आहे. याबाबत राजकीय पक्षांनी आंदोलनंही केली, मात्र हे खड्डे काही बुजवले गेले नाहीत. अखेर, घटनास्थळी झालेला खड्डा अखेर स्थानिकांनी बुजवला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement