एक्स्प्लोर

मुंबई ते अहमदाबाद रेल्वेत 40 टक्क्यांहून अधिक सीट्स रिकाम्या

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना पश्चिम रेल्वेने ही माहिती दिली आहे.

मुंबई : मोदी सरकारने मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी 1 लाख कोटी खर्च करण्याअगोदर सद्यस्थितीतील मुंबई ते अहमदाबाद रेल्वे गाड्यांचा अभ्यास केलेला दिसत नाही. कारण मुंबई ते अहमदाबाद रेल्वेत गेल्या 3 महिन्यात 40 टक्के, तर अहमदाबाद ते मुंबई 44 टक्के सीट्स रिकाम्या असल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना पश्चिम रेल्वेने ही माहिती दिली आहे. या 3 महिन्यात पश्चिम रेल्वेला 29.91 कोटींच्या महसूलावर पाणी सोडावं लागलं आहे. अनिल गलगली यांनी पश्चिम रेल्वेकडे मुंबई ते अहमदाबाद आणि अहमदाबाद ते मुंबई अशा 3 महिन्यांची विविध माहिती मागितली होती. पश्चिम रेल्वेने 1 जुलै 2017 पासून 30 सप्टेंबर 2017 पर्यंतची माहिती दिली. कोणत्या ट्रेनमध्ये किती प्रवासी, रेल्वेचं किती नुकसान? मुंबई ते अहमदाबाद अशा 30 मेल एक्सप्रेसने 4 लाख 41 हजार 795 प्रवाशांनी प्रवास केला. प्रत्यक्षात 7 लाख 35 हजार 630 सीट्स होत्या. एकूण महसूल 44 कोटी 29 लाख 8 हजार 220 रुपये येणं अपेक्षित होतं. प्रत्यक्षात 30 कोटी 16 लाख 24 हजार 623 रुपये एवढा महसूल मिळाला. म्हणजे पश्चिम रेल्वेला 14,12,83,597 एवढं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. अहमदाबाद ते मुंबई दरम्यान 31 मेल एक्सप्रेसची सुविधा आहे. गेल्या तीन महिन्यात 3 लाख 98 हजार 2 प्रवाशांनी प्रवास केला. प्रत्यक्षात 7 लाख 6 हजार 446 सीट्स होत्या. 15 कोटी 78 लाख 54 हजार 489 एवढं आर्थिक नुकसान सहन करणाऱ्या पश्चिम रेल्वेला रुपये 42 कोटी 53 लाख 11 हजार 471 इतका महसूल अपेक्षित होता. पण फक्त 26 कोटी 74 लाख 56 हजार 982 एवढा महसूल प्रवाशांच्या तिकिटातून मिळाला. यात दुरांतो, शताब्दी, गुजरात मेल,भावनगर, सौराष्ट्र, विवेक, भुज, लोकशक्ती सारख्या गाड्यांचा समावेश आहे. शताब्दीमध्येही प्रवासी नाहीत 12009 शताब्दी ज्या कार चेअरसाठी प्रसिद्ध आहे त्यात अहमदाबादला जाताना 72 हजार 696 पैकी फक्त 36 हजार 117 प्रत्यक्ष प्रवासी मिळाले. 7 कोटी 20 लाख 82 हजार 948 रुपयांऐवजी 4 कोटी 11 लाख 23 हजार 86 रुपये कमाई झाली. Executive चेअरच्या 8 हजार 216 पैकी 3 हजार 468 सीटसवर प्रवासी होते. यातून 1 कोटी 63 लाख 57 हजार 898 ऐवजी 64 लाख 14 हजार 345 कमाई झाली. अहमदाबादहून मुंबईकडे परतताना 12010 या शताब्दीमध्ये 67 हजार 392 पैकी 22 हजार 982 सीट्सवर प्रवासी होते. यातून 6 कोटी 39 लाख 8 हजार 988 ऐवजी 2 कोटी 51 लाख 41 हजार 322 इतकीच कमाई झाली. Executive चेअरच्या 7 हजार 505 पैकी फक्त 1 हजार 469 सीट्सवर प्रवासी होते. ज्यांच्याकडून रेल्वेला 1 कोटी 45 लाख 49 हजार 714 रुपयांऐवजी 26 लाख 41 हजार 83 रुपये महसूल मिळाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray Anand Ashram Video : 19 वर्षांनी आनंदाश्रमात पहिलं पाऊल, राज ठाकरेंचा संपूर्ण व्हिडीओRaj Thackeray Thane : शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदा दिघेंच्या आनंद आश्रमातRaj Thackeray Thane : राज ठाकरे आनंद आश्रमात, Anand Dighe यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तकTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 07 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
Embed widget