एक्स्प्लोर

Monsoon Rain Mumbai: मोठी बातमी: मान्सून पुण्यात दाखल, पुढील 48 तासांत मुंबईत धडकणार, हवामान खात्याकडून पावसाविषयी महत्त्वाची अपडेट

Monsoon Rain Mumbai: पावसाविषयी आनंदाची बातमी. मान्सून पुण्यात दाखल झाला असून लवकरच मुंबईत प्रवेश करेल, असे सांगितले जात आहे.

Monsoon Rain Mumbai: नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनबाबत हवामान खात्याने महत्त्वाची माहिती जारी केली आहे. त्यानुसार पुढील 48 तासांमध्ये मान्सून (Monsoon) मुंबईत प्रवेश करणार आहे. तर मान्सूनने पुण्यात प्रवेश केल्याचेही हवामान खात्याने जाहीर केले आहे. हवामान खात्याकडून वातावरणातील बदलाचा एक नकाशा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार मान्सून रेषा अलिबाग, पुणे, निझामाबाद, दांतेवाडा, बलंगीर, सुंदरगड, गया आणि मुझफ्फरपूरपर्यंत पोहोचली आहे, अशी घोषणा भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पावसासाठी बराच काळ ताटकळत बसलेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईत एरवी दरवर्षी 7 ते 8 जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो. मात्र, यंदा 20 जून उलटला तरी मान्सून मुंबईत दाखल न झाल्याने परिस्थिती बिकट झाली होती. दरम्यान, सोमवारी सकाळी मुंबईकरांना मान्सूनच्या आगमनाची वर्दी मिळाली. रविवारी आणि सोमवारी सकाळी मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, सकाळी काही काळ रिमझिम सरी बरसल्यानंतर मान्सूनपूर्व पावसाने पुन्हा दडी मारली. त्यामुळे वातावरणातील उकाडा अजूनही कायम आहे. (Maharashtra Rain news)

Monsoon Rain: राज्यात 24 जूनपासून पावसाचा जोर वाढणार

एल निनोचा प्रभाव, कोरडी हवा आणि कमी दाबाच्या क्षेत्रांचा अभाव या सर्व घटकांच्या एकत्र येण्यामुळे मान्सूनची वाटचाल संथ झाली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात 24 ते 28 जून या कालावधीत हवामान प्रणाली हळूहळू उत्तर किनारपट्टी आणि राज्यांच्या अंतर्गत भागांकडे सरकणार आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सोमवारपासून दक्षिण कोकण आणि महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. गेल्या 15 दिवसांपासून रेंगाळलेला मान्सून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यापर्यंत थोडाफार सक्रिय झाला आहे. 

Mumbai Water: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 8.68 % पाणीसाठा


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 8.68 % पाणीसाठा, मुंबईची तहान भागवण्यासाठी  राखीव पाणीसाठ्याचा वापर करावा लागणार. मुंबई महापालिकेने राज्य सरकारच्या मालकीच्या अप्पर वैतरणा धरणातून ९० हजार दशलक्ष लिटर, तर भातसा धरणातून १ लाख ४० हजार दशलक्ष लिटर राखीव साठ्याच्या पाण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. राज्य सरकारने राखीव साठ्याच्या वापरासाठी परवानगीही दिली आहे. आतापर्यंत हा साठा वापरावा लागला नव्हता. मात्र, आता अप्पर वैतरणा  धरणातील पाणी साठा शून्यावर आल्यामुळे आता या साठ्याला हात घालावा लागणार आहे.

अप्पर वैतरणा वैतरणा - ० टक्के

मोडकसागर - २३.८० टक्के

तानसा- ३.०४ टक्के

मध्य वैतरणा- १०.३४ टक्के

भातसा- ७.९९ टक्के

विहार -४१.२५ टक्के

तुलसी- २२.०२ टक्के

एकूण -८.६८ टक्के

पाणीसाठ्याच्या नियोजनाकरिता पालिका प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.  मुंबईत आधीच १५ मे पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. तसेच, पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी पिण्याव्यतिरिक्त इतर वापरावरही १७ जून २०२६ पासून मर्यादा घालण्यात आल्या आहेत.  बांधकामे व जलतरण तलावांना दिलेल्या जलजोडण्या खंडित करण्यात येणार आहेत. तसेच औद्योगिक व व्यापारी तसेच स्पोर्ट्स क्लब आस्थापनांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe VIDEO : ज्या महिलांकडून सत्कार, त्यांच्याकडूनच विनयभंगाची तक्रार, स्वतःचे कपडे फाडून घेण्याचा डाव; तुकाराम मुंढेंनी सागितला धक्कादायक किस्सा
ज्या महिलांकडून सत्कार, त्यांच्याकडूनच विनयभंगाची तक्रार, स्वतःचे कपडे फाडून घेण्याचा डाव; तुकाराम मुंढेंनी सागितला धक्कादायक किस्सा
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा राजीनामा, सचिवांकडून पुढील प्रक्रियेला सुरुवात, तक्रारींची चौकशी सुरु झाल्याची माहिती 
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा राजीनामा, सचिवांकडून पुढील प्रक्रियेला सुरुवात, तक्रारींची चौकशी सुरु झाल्याची माहिती 
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget