एक्स्प्लोर
मोनोरेल भक्तीपार्क स्टेशनवर पुन्हा बंद पडली

मुंबई : मुंबईची मोनोरेल पुन्हा एकदा रखडली आहे. तांत्रिक बिघडामुळे अडकलेल्या पहिल्या मोनोरेलला काढण्यासाठी आलेली दुसरी मोनोरेलही अडकली आहे. सकाळी 6 वाजताच्या सुमाराला भक्तीपार्कजवळ एक मोनोरेल अडकली आणि ती काढायला दुसरी मोनोरेल आली. मात्र, दुसरीही मोनोरेल अडकली. सकाळी 6 वाजल्यापासून दोन्ही मोनोरेल अडकल्या असून, दुरुस्तीचं काम अद्यापही सुरु आहे. गेल्या दोन तासापासून प्रवासी लटकले आहेत. हे दृश्य पाहून काही काळ नागरिकांमधे कुतूहलाचं वातावरण निर्माण झालं होतं.
आणखी वाचा























