एक्स्प्लोर

दुसऱ्या टप्प्यातील मोनो रेल्वेला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील

मोनोतील प्रवासी संख्या नक्की वाढेल मोनोचा तोटाही भरुन निघेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. लवकरच इंटिग्रेटेड तिकीट प्रणाली सुरू केली जाईल. ज्याद्वारे एका तिकिटावर रेल्वे, मोनो, मेट्रो आणि बेस्ट बसचा प्रवास करता येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

मुंबई : बहुप्रतिक्षीत वडाळा ते सातरस्ता या मोनोच्या दुसऱ्या टप्प्याचा आज शुभारंभ झाला. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या 12 किलोमीटरच्या मोनो रेल्वेचा दुसरा टप्पा आजपासून सुरु करण्यात आला. वडाळा डेपो येथे मोनोच्या दुसऱ्या टप्प्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं.

मोनोचा पहिला 9 किमीचा स्ट्रेच केवळ जॉयराईड होता. ती सिस्टीम केवळ पाहण्याकरता होती. मात्र आता दुसऱ्या टप्प्यातील मोनोमुळे मोनो खऱ्या अर्थानं लोकोपयोगी होणार आहे. मोनोतील प्रवासी संख्या नक्की वाढेल मोनोचा तोटाही भरुन निघेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. लवकरच इंटिग्रेटेड तिकीट प्रणाली सुरू केली जाईल. ज्याद्वारे एका तिकिटावर रेल्वे, मोनो, मेट्रो आणि बेस्ट बसचा प्रवास करता येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

दुसऱ्या टप्प्यातील स्थानके

वडाळा ते सातरस्ता असा 12 किमीचा मोनोरेल्वेचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. या मार्गावर संत गाडगे महाराज चौक, लोअर परळ, मिंट कॉलनी, आंबेडकर नगर, नायगाव, दादर पूर्व, वडाळा पूल, आचार्य अत्रे नगर, अँटॉप हिल आणि जी. टी. बी. नगर ही स्टेशन्स असणार आहेत.

पहिला टप्पा तोट्यात

फेब्रुवारी 2014 मध्ये मोनोचा चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा सुरू झाला होता. मात्र, मोनोरेल्वेच्या या पहिल्या टप्प्यातच मोनोरेल्वे फेल गेली. पहिल्या टप्प्यातील स्थानके ही फारशी वर्दळीची नसल्याने मोनोला सुरुवातीपासूनच अपेक्षित प्रवासी संख्या मिळू शकली नाही.

मोनोचा प्रवास हा तोट्यातच सुरू आहे. मोनोला दरमहा किमान 80 लाख ते एक कोटींचा तोटा होत आहे. आजच्या घडीला रोज जेमतेम 15 हजार प्रवासी मोनोने प्रवास करतात. तर, दिवसाला फक्त 18 ते 20 हजार रुपयांचा महसूल तिकीट विक्रीतून मिळतो.

दुसऱ्या टप्प्यातही मोनोला थंड प्रतिसाद मिळणार?

दुसऱ्या टप्प्यातील मोनोकडून खूप अपेक्षा असली तरी दुसऱ्या टप्प्यातील मोनोकडूनही अपेक्षाभंग होऊ शकतो. कारण चेंबूर ते सातरस्त्याच्या मोनोच्या दोन्ही टप्प्यांवर मिळून केवळ चारच मोनो रेल्वे चालणार आहेत. मोनो रेल्वेची संख्या कमी असल्यानं एक मोनो गेल्यानंतर दुसरी मोनो येण्यास तब्बल 22 मिनिट वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे, मोनो सुरु झाली तरी प्रवासी मिळणार का हा प्रश्न आहे.

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
Mumbai KEM Hospital : तुकाराम मुंढेंनी वात पेटवली, आता आरोग्य समितीच्या अध्यक्षांची केईएम रुग्णालयात अचानक धाड, मध्यरात्री नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंनी वात पेटवली, आता आरोग्य समितीच्या अध्यक्षांची केईएम रुग्णालयात अचानक धाड, मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Bogus Seeds News : राज्यभरात बोगस खत ,अन् निकृष्ठ बियाणांचा सुळसुळाट; आता फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन, नेमकं काय होणार?
राज्यभरात बोगस खत ,अन् निकृष्ठ बियाणांचा सुळसुळाट; आता फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन, नेमकं काय होणार?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
Rohit Sharma : लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा हिटमॅनला फुल सपोर्ट
लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूची मन की बात
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
Share Market : भारतीय शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
Jayant Patil: जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
मे महिन्यापासून बेपत्ता, माळरानावर सापडला हाडांचा सांगाडा; खळबळजनक घटनेची चर्चा, नातेवाईकांवर शोककळा
मे महिन्यापासून बेपत्ता, माळरानावर सापडला हाडांचा सांगाडा; खळबळजनक घटनेची चर्चा, नातेवाईकांवर शोककळा
Congress : मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ
मोदी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेत नाहीत, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा का दिला नाही? हा मूळ मुद्दा : हर्षवर्धन सपकाळ
Embed widget