BMC Election Result: मुंबईच्या निकालाबाबत मोहित कंबोजांचा ठाकरे बंधूंना धडकी भरवणारा आकडा, भाजपला किती जागा? ठाकरेंच्या नेत्याला वेगळाच संशय
BMC Election Result: मुंबई महानगर पालिकेच्या इतिहासात मुंबईचा महापौर प्रथमच भाजपाचा होण्याचा इतिहास घडणार का? याकडे राज्याचं लक्ष लागले आहे.

मुंबई: मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकेसाठी काल (१५ जानेवारीला) मतदान प्रक्रिया पार पडली, त्याचा निकाल आज जाहीर होणार आहे, एक्झिट पोलमध्ये अनेक संस्थांनी भाजपा आणि शिवसेना महायुतीला बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे मुंबई महानगर (BMC Election Result) पालिकेच्या इतिहासात मुंबईचा महापौर प्रथमच भाजपाचा होण्याचा इतिहास घडणार का? याकडे राज्याचं लक्ष लागले आहे. अशातच कायमच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे भाजप नेते मोहित कंबोज यांनी मुंबई पालिकेमध्ये मॅजिक फिगर जिंकणार असल्याचा दावा केला आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मिडीया एक्सवरती दोन पोस्ट करत आपला अंदाज वर्तवला आहे.
भाजप नेते मोहित कंबोज यांनी भाजप मुंबई महानगरपालिकेमध्ये १००+ जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी ११० कमळाची फुले आणि अधिक चिन्ह अशी सुचक पोस्ट केली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात भाजपाच मुंबई काबीज करेल का? अशी चर्चा रंगली आहे.(BMC Election Result)
Bjp Mumbai Crossing 100+ @BJP4Mumbai @AmeetSatam
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitkamboj_) January 15, 2026
BMC Election Result: मोहित कंबोज यांच्या पोस्टला प्रत्युत्तर देत अखिल चित्रेंचा हल्लाबोल
तर मोहित कंबोज यांच्या या जागांवरील दाव्यावरती शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी हल्लाबोल केला आहे, कंबोज यांची पोस्ट शेअर करत त्याला प्रत्युत्तर देत अखिल चित्रे म्हणालेत, "क्रोनॉलॉजी समजून घ्या...
⚠️ भाजपा निवडणुकीत पाण्यासारखा पैसा ओततो...
⚠️ तेव्हा कंबोज अमेरिकेत असतो...
⚠️ मग कंबोज निवडणूकीच्या आधी भारतात येतो...
⚠️ भाजपाच्या विजयाचे आकडे देतो...
⚠️ तसेच एक्झिट पोल येतात...
⚠️ आणि तरीही जनमानस चिंतेत आणि फक्त कंबोजचा पक्ष आसुरी आनंदात असतो !
हेच आपण पाहतोय... आणि निवडणूक निकालात हे कंबोजचे आकडे खरे ठरले तर 'कंबोज : अमेरिका : ईव्हीएम : भाजपा : अघोरी बहुमत' ह्यांचा परस्परांशी काहीही संबंध आढळला तर तो महाराष्ट्र्राने योगायोग का समजावा ? पण आता वाचा आणि निमूटपणे सहन करा !", अशी संताप व्यक्त करणाकी पोस्ट चित्रे यांनी लिहली आहे.
क्रोनॉलॉजी समजून घ्या...
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) January 16, 2026
⚠️ भाजपा निवडणुकीत पाण्यासारखा पैसा ओततो...
⚠️ तेव्हा कंबोज अमेरिकेत असतो...
⚠️ मग कंबोज निवडणूकीच्या आधी भारतात येतो...
⚠️ भाजपाच्या विजयाचे आकडे देतो...
⚠️ तसेच एक्झिट पोल येतात...
⚠️ आणि तरीही जनमानस चिंतेत आणि फक्त कंबोजचा पक्ष आसुरी आनंदात असतो… https://t.co/H1z9Mv3e3n
BMC Election Result: कोण जिंकेल कोण हरेल याचा निर्णय जनता करेलच ... - देशपांडे
तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील सोशल मिडीयावरती पोस्ट शेअर करत म्हटलंय की, "आज मुंबई महानगरपालिकेचे निकाल आहेत. कोण जिंकेल कोण हरेल याचा निर्णय जनता करेलच पण ज्या हिमतीने माझ्या सहकारी महाराष्ट्र सैनिकांनी ही निवडणूक लढवली, मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन."
आज मुंबई महानगरपालिकेचे निकाल आहेत.कोण जिंकेल कोण हरेल याचा निर्णय जनता करेलच पण ज्या हिमतीने माझ्या सहकारी महाराष्ट्र सैनिकांनी ही निवडणूक लढवली,मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 16, 2026























