एक्स्प्लोर

Mohit Kamboj Car Attack : कंबोज यांच्यावर हल्ला, भाजप आक्रमक; मोहित कंबोज यांची पोलिसांत लेखी तक्रार

Mohit Kamboj Car Attack : मोहित कम्बोज यांच्या गाडीवर झालेला हल्ला म्हणजे मॉब लिंचिंगचा प्रकार आहे. पोलिसांत तक्रार करणाऱ्या भाजप नेत्यांचा हल्लाबोल केलाय. तर कम्बोज यांनी रेकी केल्याचा शिवसेनेचा आरोप

Mohit Kamboj Car Attack : एकीकडे हनुमान चालिसा पठणावरुन राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना या वाद रंगला असतानाच, काल (शुक्रवारी) भाजप (BJP) नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला. याप्रकरणी मोहित कंबोज यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून त्यांनी लेखी तक्रार नोंदवली आहे. मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी सांताक्रूझ पोलीस स्थानकात लेखी तक्रार नोंदवली. मातोश्री कलानगरबाहेर उपस्थित असलेल्या शिवसैनिकांच्या जमावानं त्यांना बळजबरीनं गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. वांद्रे येथील कलानगरजवळच्या सिग्नलवरील सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन या घटनेतील सत्य समोर येऊ शकतं, असंही मोहित कंबोज यांनी तक्रारीत म्हटलं आहे. या हल्ल्याचा राजकीय सूत्रधार कोण आहे? याचा तपास करण्यात यावा, असंही कंबोज यांनी तक्रारीत म्हटलं आहे. कलम 307,149,506(2)आयपीसी 34 अन्वये एफआयआर नोंदवून आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी मोहित कंबोज यांनी तक्रारीतून मुंबई पोलिसांकडे केली आहे. 

राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना वाद शिगेला पोहोचला असतानाच, काल भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. मातोश्री बंगल्याबाहेरून मोहित कंबोज यांची गाडी जात असताना शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. दरम्यान या घटनेसंदर्भात काल रात्री उशिरापर्यंत भाजप नेत्यांची बैठक सुरु होती. कंबोज यांच्या घरावर झालेला हल्ला म्हणजे मॉब लिंचिंगचा प्रकार होता असा आरोप भाजप नेत्यांनी केला असून, हल्ल्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान मोहित कंबोज रेकी करण्यासाठी आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. तर  मोहित कंबोज शिवसैनिकांवर हल्ला करण्यासाठी आल्याचा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केलाय.

घडलं नेमकं काय? 

राणा दाम्पत्य आज मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्याविरोधात शिवसैनिक मातोश्रीबाहेर पहारा देत होते. एवढ्यात भाजप नेते मोहित कंबोज यांची कार मातोश्रीबाहेरुन जात असताना शिवसैनिकांनी त्यांच्या कारवर हल्ला केला. मोहित कंबोज रेकी करण्यासाठी आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. शिवाय मोहित कंबोज शिवसैनिकांवर हल्ला करण्यासाठी आल्याचा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला. दरम्यान मोहित कंबोज यांनी शिवसेनेचे सर्व आरोप खोडून काढले. तर हल्ल्यानंतर भाजप नेते कंबोज यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget