एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एनएसजी कमांडोजचं मंत्रालयात मॉक ड्रील, आपत्कालीन परिस्थितीसाठीची प्रात्यक्षिकंही सादर
एनएसजीच्या कमांडोजचे मंत्रालयात मॉकड्रील आज पार पडलं.
मुंबई : एनएसजीच्या कमांडोजचे मंत्रालयात मॉकड्रील आज पार पडलं. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास किंवा दहशतवादी हल्ला झाल्यास काय करता येईल याचं प्रात्यक्षिक यावेळी देण्यात आलं.
मुंबई पोलीस आणि मुंबई अग्नीशमन दलाच्या सहकार्याने एनएसजीच्या कमांडोजचं हे मॉकड्रील करण्यात येत आहे. सुमारे 30 ते 40 कमांडोजनी हे मॉकड्रील केलं. एनएसजीच्याच काही कमांडोजनी दहशतवाद्यांसारखे कपडे घातले आणि मॉकड्रील केलं.
ब्लँक बुलेटस व ब्लँक हँडग्रेनेडसचाही यावेळी वातावरणनिर्मितीसाठी वापर केला गेला आहे. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुंबईतल्या मुख्यालयातही अशा प्रकारे मॉकड्रील करण्यात आलं होतं.
एनएसजी, मुंबई पोलिसांतील कमांडो तसेच अग्नीशमन दलातील कर्मचारी-अधिकारी यांचाही या मॉकड्रीलमध्ये समावेश होता.
मंत्रालयाला लागलेली आग, मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर हे मॉकड्रील महत्त्वाचं मानलं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement