एक्स्प्लोर

मनसेचा सविनय कायदेभंग : संदीप देशपांडे यांच्यासह तिघांवर गुन्हा

लोकल सेवा सुरु करण्यासाठी मनसेने सोमवारी सविनय कायदेभंग आंदोलन केलं. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काही सहकार्‍यांसह कोणत्याही परवानगीविना लोकलने प्रवास केला. त्यामुळे त्यांच्यावर कर्जत लोहमार्ग पोलिसांनी आता विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक होऊ शकते.

मुंबई : मुंबईमध्ये सर्वसामान्यांसाठी पुन्हा एकदा लोकल सुरु व्हावी यासाठी मनसेने सोमवारी (21 सप्टेंबर) वेगवेगळ्या स्थानकांमध्ये सविनय कायदेभंग आंदोलन केले. या आंदोलनात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काही सहकार्‍यांसह लोकलने कोणत्याही परवानगीविना प्रवास केला. त्यामुळे त्यांच्यावर कर्जत लोहमार्ग पोलिसांनी आता वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक होण्याची देखील शक्यता सांगण्यात येत आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्यात आली, मात्र अजूनही लाखो प्रवासी रोज धक्के खात रस्ते मार्गाने प्रवास करत आहेत. एकीकडे राज्य सरकारने एसटी बसेस आणि इतर बसेस सुरु केल्या आहेत ज्यामध्ये प्रचंड गर्दी असते. मग लोकल का सुरु करत नाही, असा सरकारला सवाल विचारत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वीच सरकारला लोकल सुरु करण्यासाठी मुदत दिली होती. ती मुदत रविवारी संपल्याने, सोमवारी सविनय कायदेभंग करुन लोकल प्रवास करणार असे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार काल सकाळी संदीप देशपांडे यांच्यासह नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळे आणि इतर दोघांनी शेळू ते नेरुळ असा लोकलने प्रवास केला. त्यानंतर या प्रवासाचे व्हिडीओदेखील प्रसारित केले आणि सरकारला परवानगीशिवाय लोकलमधून प्रवास करुन दाखवले.

लोकल सुरु करण्यासाठी मनसेचा सविनय कायदेभंग, संदीप देशपांडेंचा लोकल प्रवास!

या त्यांच्या बेकायदेशीर प्रवासासाठी कर्जत लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि इतर तीन जणांच्या विरोधात वेगवेगळ्या कलमांच्या खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारने कोरोना संसर्ग संदर्भात दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याने, स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात टाकल्याने, रेल्वेमध्ये दरवाजात लटकून प्रवास केल्याने, बेकायदेशीररित्या विनातिकीट प्रवास केल्याने, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसीच्या कलम 188 आणि 269 नुसार, राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्याच्या कलम 51 ब आणि 52 नुसार, महाराष्ट्र covid योजना 2020 च्या कलम 11 सोबत, भारतीय रेल्वे अधिनियम च्या कलम 147 153 आणि 156 अनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोहमार्ग पोलिसांनी या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये संदीप देशपांडे यांच्यासह इतर तिघांना देखील अटक होऊ शकते. या कारवाईला आता म्हणजे कशी सामोरी जाते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Samadhan Sarvankar On Shivsena UBT Vishakha Raut: व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
BMC Fellowship Programme: 61 हजार 500 रुपये मानधनासाठी तरुणाईची गर्दी; 50 जागांसाठी अडीच हजार तरुणांची रुची, BMC फेलोशिपला डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षितांचाही प्रतिसाद
61 हजार 500 रुपये मानधनासाठी तरुणाईची गर्दी; अवघ्या 50 जागांसाठी अडीच हजार तरुणांची रुची, महापालिका फेलोशिपला डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षितांचाही प्रतिसाद
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Embed widget