एक्स्प्लोर

मनसेवर पालिकेतील पक्ष कार्यालय सोडण्याची वेळ?

मनसेला सुरुवातीला महापालिका इमारतीत पक्ष कार्यालय देण्यात आलं होतं. मात्र, आता एकच नगरसेवक राहिल्यानं मनसेचं पक्ष कार्यालय काढून घेतलं जाऊ शकतं.

मुंबई : शिवसेनेनं मुंबईतले 7 नगरसेवक फोडल्यानंतर आता फक्त एकच नगरसेवक राहिलेल्या मनसेवर महापालिकेतील पक्ष कार्यालय सोडण्याची वेळ आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत 7 नगरसेवक असलेल्या मनसेला सुरुवातीला महापालिका इमारतीत पक्ष कार्यालय देण्यात आलं होतं. मात्र, आता एकच नगरसेवक राहिल्यानं मनसेचं पक्ष कार्यालय काढून घेतलं जाऊ शकतं. त्यामुळे मनसेचं हे कार्यालय समाजवादी पक्ष घेऊ शकतं. दुसरीकडे शिवसेनेच्या या खेळीनं त्यांना सभागृहात महत्त्वाचे प्रस्ताव पास करुन घेणं बरचंस सोपं जाणार आहे. याआधी कोणताही प्रस्ताव पास करुन घेण्यासाठी मनसे किंवा भाजपची मनधरणी करावी लागत होती. मात्र, आता या खेळीनंतर शिवसेनेला मनसेवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. शिवसेनेला सभागृहात खिंडीत गाठण्यासाठी भाजपला राष्ट्रवादी आणि काँग्रेसची गरज घ्यावी लागू शकते. त्यामुळे आता या दोन्ही पक्षांच्या भूमिकाही महत्त्वाच्या ठरणार आहेत. दरम्यान, काल मुंबई महापालिकेतील मनसेच्या 7 पैकी 6 नगरसेवकांना शिवसेनेत सामील करून घेत, उद्धव ठाकरेंनी एका दगडात दोन पक्षी मारले. यामुळे  मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्याची स्वप्न पाहणाऱ्या भाजपच्या मनसुब्यांना सुरूंग लागला आहे. मनसे सोडणाऱ्या 6 नगरसेवकांनी कोकण आयुक्तांकडे गटनोंदणीसाठी तयारी सुरू केली आहे. पण पक्षाच्या परवानगीशिवाय नगरसेवक गट स्थापन करू शकत नाही असा दावा मनसेनं केला आहे. तसंच गटनोंदणी टाळण्यासाठी भाजपची देखील धडपड सुरू आहे. मनसेच्या सहा नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल (शुक्रवार) शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. मुंबईतील ‘मातोश्री’ या निवासस्थानावर त्यांनी हे शिवबंधन बांधलं. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन सहा जुने सहकारी पुन्हा शिवसेनेत आल्याचं उद्धव म्हणाले. अर्चना भालेराव (वॉर्ड 126), परमेश्वर कदम (वॉर्ड 133), अश्विनी मतेकर (वॉर्ड 156), दिलीप लांडे (वॉर्ड 163), हर्षल मोरे  (वॉर्ड 189), दत्ताराम नरवणकर यांनी सेनाप्रवेश केला.   मराठी माणसाचा पराभव जिव्हारी मुंबईत मराठी माणसाचं हित शिवसेनाच जपते. काल मराठी माणसाचा पराभव आमच्या जिव्हारी लागला. मुंबईतून मराठी महापौर हटवण्याची भाषा भाजपने केल्याचं आपल्याला रुचलं नाही. त्यामुळे मराठी माणसाच्या हितासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रातिनिधीक प्रतिक्रिया सेनेत प्रवेश केलेले नगरसेवक दिलीप लांडे यांनी व्यक्त केली.   तर ते मित्रपक्ष कसले? आमचं बळ वाढल्याने त्यांच्या पोटात मुरडा येत असेल, तर ते मित्रपक्ष कसले? असा जळजळीत सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. भाजप आम्हाला मित्रपक्ष मानत असेल, तर आमचं बळ वाढल्याने त्यांना पोटदुखी कशाला? असंही उद्धव म्हणाले.   भांडुपची पोटनिवडणूक सहानुभूतीने जिंकली इतरांनी केली तर खुद्दारी आणि आम्ही केली तर गद्दारी, असं कसं, असा टोलाही फोडाफोडीच्या आरोपांवर उद्धव ठाकरेंनी हाणला. फोडाफोडी तेव्हा झाली होती, आज त्या सहा जणांची घरवापसी झाली आहे, असंही उद्धव म्हणाले. भांडुपची पोटनिवडणूक भाजपने नाही, तर सहानुभूतीने जिंकली, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला. कोणाला फटका द्यायचा म्हणून त्या सहा नगरसेवकांना शिवसेनेत घेतलं नाही, त्यांनीच शिवसेनाप्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. शिवसेना-भाजपाच्या भांडणाचा परिणाम मनसेला झाला असं नाही. हे सगळे मनापासून शिवसैनिक होते, ते परत आले.आम्ही महापालिकेत भाऊ आहोतच, भाजपाला कल्पना नव्हती की मातोश्रीवर त्यांचा भाऊ राहतो, असंही उद्धव म्हणाले. शिवसेनेकडून घोडेबाजार: ‘पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेकडून घोडेबाजार सुरु झाला आहे. यासंबंधी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी लाचलुचपत विभाग, कोकण आयुक्त आणि पोलिसांकडे तक्रारही केली आहे. जनताही शिवसेनेचा हा घोडेबाजार पाहात आहे. आम्ही शिवसेनेच्या या घोडेबाजाराचा पर्दाफाश करु.’ अशी प्रतिक्रिया भाजप गटनेते मनोज कोटक यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. पोटनिवडणुकीमुळे शिवसेना-भाजपची चढाओढ मुंबईतील प्रभाग क्र. 116 मध्ये (भांडुप पश्चिम) पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा पराभव केला. त्यामुळे मुंबई महापालिकेतील भाजपचं संख्याबळ 83 तर शिवसेनेची संख्या 84 झाली आहे. मात्र शिवसेनेला 4 अपक्ष तर भाजपला 2 अपक्षांची साथ आहे.   ‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान ‘मुंबई महापालिकेत चिन्हानुसार आता शिवसेना 84 आणि भाजप 83 अशी स्थिती झाली आहे. मी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान देतो, ही स्थिती लवकरच बदलून भाजप 84 आणि शिवसेना 83 अशी होईल आणि आमचा महापौर बसेल.’ असं वक्तव्य सोमय्यांनी केलं होतं. संबंधित बातम्या :

घोडेबाजारी केल्याचा आरोप गाढवांनी करु नये : उद्धव ठाकरे

पूर्वाश्रमीचे शिवसैनिक पुन्हा शिवसेनेत : अनिल परब 7 नगरसेवक, 13 आमदार ते मनसेकडे उरलेला एकटा नगरसेवक पहिल्या मास्टरस्ट्रोकनंतर शिवसेनेची तात्काळ दुसरी खेळी! शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबत मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण? मॉकड्रीलचं कारण देत मुंबई महापालिकेच सर्व दरवाजे बंद! करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप

दगाफटका योग्य नाही, नगरसेवकांवर राज ठाकरे भडकले

‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान मोठे दावे करणार्‍यांचे पोट फाडून भाजपचा विजय : आशिष शेलार भांडुप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, सत्ता समीकरणं कशी बदलणार? मुंबई वॉर्ड क्रमांक 116 पोटनिवडणूक : भाजपच्या जागृती पाटील विजयी करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप शिवसेनेला पश्चाताप, जागृती पाटील सेनेत येणार होत्या! फोडाफोडी आणि थैलीशाहीचे राजकारण नेहमीच यशस्वी होत नाही: शिवसेना
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
Embed widget