एक्स्प्लोर
मनसेकडून 'ऐ दिल है मुश्किल', 'रईस' चित्रपटांवर बंदीची मागणी

वसई: पाकिस्ताननं केलेल्या उरी हल्ल्यानंतर मनसेनं पाकिस्तानी कलाकारांना देश सोडून जाण्यासाठी अल्टीमेटम दिलं होतं. त्यानंतर आता पाकिस्तानी कलाकारांच्या चित्रपटांवर बंदी घालण्यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. करण जोहर दिग्दर्शित 'ऐ दिल है मुश्किल' आणि शाहरुख खानचा 'रईस' या दोन चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी मनसे केली आहे. त्यासाठी वसई-विरारमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मल्टिप्लेक्समध्ये जाऊन हे दोन्ही चित्रपट थिएटरमध्ये लावू नयेत अशी विनंती केली आहे. वसईतल्या आठ मल्टीप्लेक्सना हे निवेदन देण्यात आलं आहे. मागणी मान्य न झाल्यास मनसे स्टाईलनं आंदोलनाचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.
आणखी वाचा























