एक्स्प्लोर

मुंबईत शुल्कवाढ करणाऱ्या महाविद्यालयांना मनसे विद्यार्थी सेनेचा इशारा

शैक्षणिक शुल्कात वाढ करणाऱ्या मुंबईतील चेतना कॉलेज आणि मिठीबाई कॉलेज यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून इशारावजा पत्र देण्यात आले आहे. आर्थिक फायद्यासाठी जर विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्यास गाठ आमच्याशी आहे, असा सूचक इशारा मनविसेच्या वतीने देण्यात आला आहे.

मुंबई : शैक्षणिक शुल्कात वाढ करणाऱ्या मुंबईतील चेतना कॉलेज आणि मिठीबाई कॉलेज यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून इशारावजा पत्र देण्यात आले आहे. आर्थिक फायद्यासाठी जर विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्यास गाठ आमच्याशी आहे. असा सूचक इशारा मनविसेच्या वतीने देण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी हा इशारा दिला आहे.

अखिल चित्रे यांनी त्यांच्याकडे मिठीबाई कॉलेज आणि चेतना कॉलेज यांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी शैक्षणिक शुल्कात वाढ केली आणि विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावला अशा तक्रारी आल्याच्या म्हंटल आहे. त्या तक्रारींच्या अनुषंगाने त्यांनी शनिवारी चेतना कॉलेज आणि मिठीबाई कॉलेजच्या प्रशासनाची भेट घेतली आणि त्यांनी यावर्षी शैक्षणिक शुल्कात वाढ करू नये. यासोबतचं सध्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे कुटुंब चालवण्यासाठी पैसे नाहीत, त्यामुळे महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना पैशासाठी तगादा लावू नये. यासोबतच विद्यार्थ्यांच्या पालकांना पैसे भरण्यासाठी हफ्त्यांची सोय उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी केली होती. अशा प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या तर शाळा महाविद्यालये देखील अडचणीत येणार नाहीत आणि विद्यार्थ्यांच्या पालकांवर शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी ताण येणार नाही. याबाबत बोलताना अखिल चित्रे म्हणाले की, राज्यासह संपूर्ण जगाला सध्या कोरोना व्हायरस सारख्या महाभयंकर आजाराने ग्रासले आहे. यामध्ये अनेक नागरिकांचे जीव देखील गेले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ही परिस्थिती आणखी किती महिने राहिल याबाबत सध्या अंदाज वर्तवने देखील अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. यासोबतचं अनेक अशी कुटुंब आहेत की घरात कमावणारी एक व्यक्ती आहे. कुटुंबात त्यांच्यावर अवलंबून राहणारे अनेकजण आहेत.

मुंबईत शुल्कवाढ करणाऱ्या महाविद्यालयांना मनसे विद्यार्थी सेनेचा इशारा मुंबईत शुल्कवाढ करणाऱ्या महाविद्यालयांना मनसे विद्यार्थी सेनेचा इशारा मुंबईत शुल्कवाढ करणाऱ्या महाविद्यालयांना मनसे विद्यार्थी सेनेचा इशारा

पेंग्वीन गँगच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार; मनसेचा आरोप

अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरावे की घराचे तीन तीन महिन्यांपासून थकलेले घरभाडे भरावे की कुटुंबाला जगवावे. असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. या परिस्थितीचा अंदाज घेऊन मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना शैक्षणिक शुल्क घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मागे तगादा लावू नये असं परिपत्रक काढलं आहे. परंतु, तरीदेखील मुंबईतील मिठीबाई आणि चेतना कॉलेजने मात्र विद्यार्थ्यांना पैसे भरण्यासाठी मेसेज केले आहेत. ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. महाविद्यालयांनी सध्याच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी मासिक हफ्त्यांची सोय उपलब्ध करुन द्यावी. जर महाविद्यालयांनी आम्ही इशारा देऊन देखील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात वाढ केली आणि विद्यार्थ्यांच्या मागे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी तगादा लावला तर मात्र महाराष्ट्र विद्यार्थी सेना गप्प बसणार नाही. या विरोधात मोठं पाऊल उचललं जाईल. यामुळे होणाऱ्या नुकसानाला महाविद्यालय प्रशासन जबाबदार असेल.

मनविसेच्या पत्रानंतर मिठीबाई महाविद्यालयाकडून शैक्षणिक शुल्कातील वाढ रद्द मनविसेच्या वतीने देण्यात आलेल्या पत्रानंतर मिठीबाई महाविद्यालयातील बँच़लर ऑफ मास मीडिया अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्कात करण्यात आलेली वाढ अखेर रद्द करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाच्या चौथ्या सत्रासाठी 35 हजार रुपये इतके शुल्क होते. मात्र, यात 4 हजार रुपयांची वाढ करण्यात आली होती. तशा आशयाचे मेसेज देखील विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. अखेर मनविसेच्या पत्रानंतर शुल्कवाढ रद्द करण्यात आली आहे.

MNS on Deadbody bags | शवपिशव्या घोटाळा, काय खरं काय खोटं? मनसेकडून विश्लेषण

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Devendra Fadnavis on OBC Census: मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Sunil Kendrekar Majha Katta : माहिती नसलेलं FDA तुकाराममुळे समजलं, तो जे काम करतोय ते उत्कृष्ट, माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकरांकडून 'माझा कट्टा'वर कौतुक
माहिती नसलेलं FDA तुकाराममुळे समजलं, तो जे काम करतोय ते उत्कृष्ट, माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकरांकडून 'माझा कट्टा'वर कौतुक

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis on OBC Census: मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
Embed widget