एक्स्प्लोर
Advertisement
मनसेकडून पेट्रोल 4 रुपयांनी स्वस्त, राज ठाकरेंच्या बर्थडेनिमित्त भेट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पेट्रोलवर 4 रुपयांची सवलत देण्यात येणार आहे.
मुंबई: दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भरमसाठ वाढत असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वसामान्यांना एक दिवसासाठी दिलासा दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पेट्रोलवर 4 रुपयांची सवलत देण्यात येणार आहे.
येत्या 14 जून रोजी मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर ही सूट देण्यात येईल.
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ही माहिती दिली. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना पेट्रोलचे दर कमी करण्यात सरकारला अपयश येत असल्याची टीका यावेळी मनसेकडून करण्यात आली आहे.
मनसेने फक्त टीकाच केली नाही तर एक दिवस का असेना, पेट्रोल दरात मोठी कपात करत 36 ठिकाणी 4 रुपये स्वस्त पेट्रोल देण्यात येणार आहे.
मनसे सरकारमध्ये नसूनही 4 रुपयांनी स्वस्त पेट्रोल देत असेल, तर केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना मोदींना हे कसे शक्य नाही, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 29, 201817 व्या दिवशी पेट्रोल स्वस्त दरम्यान, गेली 16 दिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असताना, आज त्याला चाप बसला आहे. सतराव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात घट झाली आहे. पेट्रोल 60 पैशांनी तर डिझेल 56 पैशांनी स्वस्त झालं आहे. इंधन दरवाढीला ब्रेक लागल्यानं नागरिकांना थोडा तरी दिलासा मिळला. मुंबईत आता पेट्रोलचा दर प्रतिलीटर 85.65 रुपये तर डिझेलचा दर 73.20 इतका झाला आहे. 24 एप्रिल ते 13 मेपर्यंत दर स्थिर कर्नाटक निवडणुकीच्या काळात 24 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे होते. 24 एप्रिल ते 13 मे पर्यंत मुंबईतील पेट्रोलचे दर 82.48 रुपये इतके होते. मात्र जसे कर्नाटकात मतदान संपले, तसे 14 मे रोजी दरवाढ करण्यात आली होती. 14 मे रोजी पेट्रोल प्रति लिटर 17 पैसे, तर डिझेल प्रति लिटर 21 पैशांनी महागलं होतं. इंधनाचे दर दररोज बदलतात. मात्र 24 एप्रिलनंतर म्हणजेच कर्नाटक निवडणुकीदरम्यान या दरांमध्ये बदलच झाले नव्हते. पण मतदान होताच आणि निकाल लागताच, पुन्हा एकदा इंधन दरात चढ-उतार सुरु झाली. 14 मेपासून सुरु झालेली इंधन दरवाढ दररोज सुरु आहे. आजपर्यंत किती रुपये वाढले? 24 एप्रिल ते 13 मेपर्यंत पेट्रोल 82.48 रुपये लिटर होतं. 14 मेपासून त्यामध्ये वाढ होत गेली. 29 मे रोजी पेट्रोलचा दर 86.14 रुपये होता. म्हणजे 14 मे ते 29 पर्यंत 3 रुपये 76 पैसे प्रति लिटर इतकी वाढ झाली होती. संबंधित बातम्या रोज पै-पै ने वाढणाऱ्या पेट्रोलची रुपयातील वाढ किती? इंधनदरवाढ सलग 15 व्या दिवशी सुरुच, पेट्रोल 12 पैशांनी महाग इंधन दरवाढीवर लवकरच दीर्घकालीन उपाययोजना : अमित शाह पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्राच्या हालचाली इंधन दरात दहाव्या दिवशी वाढ, देशात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच राहणार : केंद्र सरकार देशात सर्वात महाग पेट्रोल अमरावती, औरंगाबादमध्ये! पाकिस्तानपेक्षा भारतात पेट्रोल 33 रुपये प्रति लिटरने महाग कशामुळे? ... तर पेट्रोल 53 रुपये आणि डिझेल 41 रुपये लिटरने मिळेल पेट्रोल-डिझेलची आगेकूच, स्वत:चा विक्रम मोदींनी अनेकवेळा मोडला!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement