Raj Thackeray: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे रणशिंग फुंकणार! आज तोफ धडाडणार
Raj Thackeray: गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. पालिका निवडणुकांच्या तारखा जरी अद्याप जाहीर झाल्या नसल्या, तरी सगळ्यांनाच आता या निवडणुकांचे वेध लागले आहेत.
Raj Thackeray: गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. पालिका निवडणुकांच्या तारखा जरी अद्याप जाहीर झाल्या नसल्या, तरी सगळ्यांनाच आता या निवडणुकांचे वेध लागले आहेत. मनसेकडूनही मुंबईतील समस्यांबाबत आवाज उठवला जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नवीन वर्षात आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मुंबईत जाहीर सभा होणार आहे.
नवीन वर्षात राज ठाकरे यांची पहिली सभा शिवसेनेच्या होम ग्राउंडवर होणार आहे. महापालिकेतील प्रमुख पक्षांना टक्कर देण्यासाठी राज ठाकरे मैदानात उतरणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील अनेक समस्यांवर राजकीय पक्ष जोरकसपणे भूमिका मांडताना दिसत आहेत. यामध्ये मनसेने देखील घे भरारी अभियान राबवत आता मुंबईकरांच्या प्रश्नांना हात घालण्यासाठी सुरुवात केलेली आहे. घे भरारी अभियानांतर्गत प्रत्येक वार्डात सभा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आपल्या पक्षाची भूमिका मुंबईत दादरमध्ये आता सभा घेऊन स्पष्ट करणार आहेत. संदिप देशपांडे यांनी आज दादरमध्ये राज ठाकरे यांची जाहीर सभा असल्याची ट्वीट करत माहिती दिली आहे. त्याशिवाय मिळालेल्या माहितीनुसार, महिनाअखेर राज ठाकरेंची दादरमध्ये सभा होणार आहे.
आज सायंकाळी 7 वाजता pic.twitter.com/5E6e6vpDYk
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 7, 2023
22 जानेवारी रोजी राज ठाकरेंची सभा होणार हे निश्चित आहे. सभेच ठिकाण आम्ही लवकरच जाहीर करु, असे मनसे नेते संदिप देशपांडे यांनी सांगितलं. नवीन वर्षात राज ठाकरे यांची पहिली सभा ही दादर विभागात पार पडणार आहे. २२ जानेवारीला सभा घेणार असल्याची चर्चा आहे, मात्र तारीख अद्याप निश्चित नाही. मात्र जानेवारीच्या शेवटच्या दहा दिवसात सभा होणार आहे.
राज ठाकरेंची सभा कुठे होणार?
दादर शिवाजी पार्क मध्ये पहिली सभा घेण्यासाठी मनसे आग्रही आहे. तसेच दुसर शिवसेना भवन समोर सभा घेण्याची देखील मनसेची तयारी आहे. तिसरा पर्याय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्या जवळच्या रस्त्यावर मनसे सभा घेण्याच नियोजन करत आहे. मात्र सभा कूठे होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पक्षाच्या नेत्यांची पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा सूरू आहे.
राज ठाकरे यांची पहिली सभा आगामी महापालिका दृष्टीने पार पडणार असल्याने ते या सभेत काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. राज ठाकरे हे या सभेमध्ये मुंबई महापालिका दृष्टीने आपली ब्लू प्रिंट आणि राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकारण यावर भाषा करतील..
आगामी महानगरपालिकाच्या दृष्टिकोनातून मनसेचे दादर-माहिम मतदारसंघातील 7 वार्डवर राज ठाकरेंचं लक्ष्य आहे. राज ठाकरे यांची मुंबईतील पहिली सभा ही आगामी महापालिका दृष्टीने मुंबईतील मनसे कार्यकर्ते मुंबईतील मनसेची भूमिका ही स्पष्ट करणारी असणार आहे.