एक्स्प्लोर

Raj Thackeray : राज ठाकरेंना पुढचे दोन-तीन महिने आराम, कोणतीही सभा, भाषण किंवा मीटिंग घेता येणार नाही

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून पुढचे चार ते पाच दिवस त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे. 

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून पुढचे दोन ते तीन महिने त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. या दरम्यान राज ठाकरे यांना कोणतीही सभा, भाषण किंवा मीटिंग घेता येणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. राज ठाकरे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉ. जलील पारकर आणि डॉ विनोद अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. 

डॉक्टरांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, राज ठाकरे यांच्यावर आज हिप बोनची दीड तास शस्त्रक्रिया चालली. ऑपरेशन दरम्यान त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. आता 4 ते 5 दिवस त्यांना रुग्णालयात उपचार करून मग त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. रुग्णालयात उद्यापासून त्यांना फिजिओथेरपी दिली जाईल. नंतर त्यांच्यावर घरीसुद्धा फिजिओथेरपी आणि उपचार करण्यात येईल. पुढचे दोन ते तीन महिने त्यांना आरामच करावा लागेल

डॉक्टरांनी पुढे सांगितलं की, राज ठाकरे जोपर्यंत दोन्ही पायावर उभे राहू शकत नाहीत तोपर्यंत त्यांना कुठलीही सभा, भाषण  किंवा मीटिंग घेता येणार नाही. आता त्यांना पुढचे काही दिवस सपोर्ट घेऊनच चालावं लागेल. दोन तीन महिन्यानंतर ते चांगले होतील. सर्वात महत्वाचा म्हणजे राज ठाकरे यांच्या चाहत्यांनी काळजी करण्याची गरज नाही.

शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच्या चाचण्या करण्यासाठी राज ठाकरे यांना शनिवारी (18 जून) मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. अखेर आज त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

टेनिस खेळताना दुखापत
मध्यंतरीच्या काळात टेनिस खेळताना राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. हीच दुखापत पुन्हा एकदा बळावली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार आज लिलावती रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली.

अयोध्या दौरा स्थगित
राज ठाकरे मे महिन्यात पुणे दौऱ्यावर होते. हे दुखणं वाढल्यामुळे त्यांनी पुणे दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतले. यानंतर राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केल्याचं जाहीर केलं. येत्या 5 जून रोजी राज ठाकरे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह अयोध्या दौऱ्याला जाणार होते. त्यासाठी जय्यत तयारीही करण्यात आली. परंतु पायाचं दुखणं अधिकच वाढल्याने डॉक्टरांनी शस्त्रकियेचा सल्ला दिला. परिणामी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं.

हिप बोन म्हणजे नेमकं काय?
हिप बोन म्हणजे कमरेच्या हाडांना होणारा त्रास. विशेष म्हणजे हा त्रास आपल्याला रोज जाणवत नाही तर, अचानक शरीराच्या एका विशिष्ट भागात तणाव जाणवतो. हिप बोनचा त्रास सांध्यांमध्ये जास्त जाणवतो. अधिकतर हा त्रास स्नायू आणि हाडांवर जास्त दबाव आल्यामुळे होतो. 

हिप बोनचा त्रास कशामुळे होतो? 
ठराविक वेळेनंतर अधिक तास काम करणे,एकाच स्थितीत बराच वेळ राहणे तसेच कॅल्शिअमची कमतरता यामुळे हिप बोनचा हा त्रास होतो. बदलती जीवनशैली हे एक प्रमुख कारण आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaDoctors On Saif ali Khan : सैफ अली खानला ऑपरेशन शिएटरमधून आयसीयूमध्ये हलवलंDhananjay Munde Vaijnath Mandir : धनंजय मुंडे परळी वैजनाथ मंदिरात, वैजनाथाची विधीवत पूजाBajrang Sonawane Full PC : 'ही' उत्तरं पंकजा मुंडेंकडून अपेक्षित नाही, बीड प्रकरणावरुन हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
Nashik News : ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
Saif ali khan attack in Mumbai: लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनुभाऊ थेट जगन्मित्र कार्यालयात; वाल्मिक कराडच्या समर्थकांची गर्दी
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनंजय मुंडे परळीतील जगन्मित्र कार्यालयात पोहोचले
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
Embed widget