एक्स्प्लोर

MNS : कुलाबा बेस्ट भवनाला मनसे स्टाईल दणका, कामगारांना सेवेत करून घेण्यासाठी उद्याच बैठक 

MNS Protest At BEST Office : कॅज्युअल लेबर यांच्या प्रतिनिधींना उद्याच बेस्ट भवनामध्ये बोलावून त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं आश्वासन बेस्ट प्रशासनाने दिली आहे. 

मुंबई: वर्षानुवर्षे सेवा दिलेल्या कामगारांच्या मुलांना सेवेत कायम करून देण्यासाठी उद्याच लेबर प्रतिनिधींशी चर्चा केली जाईल आणि त्यातून मार्ग काढण्यात येईल असं आश्वासन बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलं. काही मुलांना सेवेत कायम करण्यात आलं आहे, पण इतर मुलांवर अद्याप निर्णय होत नसल्याने कुलाबा बेस्ट भवन येथे मनसेने ठिय्या आंदोलन (MNS Protest At Colaba BEST Office) केलं. त्यानंतर प्रशासनाने त्यांची भेट घेत त्यावर सविस्तर चर्चा करण्याचं मान्य केलं आहे. 

मुंबईच्या बेस्ट उपक्रमामध्ये वर्षानुवर्ष सेवा दिलेल्या कामगारांच्या मुलांना कॅज्युअल लेबर म्हणून भरती करण्यात आले होते. मनसेच्या पाठपुरवठ्याने या कामगारांना सेवेत कायम करून घेण्याचे मान्य झाले होते. त्यानुसार 30 कामगारांना सेवेत रुजू देखील करून घेण्यात आले. परंतु इतर सर्व कामगार अद्याप कायमस्वरूपी नोकरीच्या प्रतीक्षेत असल्याने येत्या 15 तारखेपासून ते कामगार उपोषणाला बसणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मनसेच्या बेस्ट कामगार कर्मचारी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बेस्ट भवनाला धडक दिली. त्यांनी आयएएस अधिकारी विजय सिंघल, जनरल मॅनेजर यांच्या दालनाबाहेर ठिय्या करत त्यांच्या बैठकीची मागणी केली.

विजय सिंघल यांनी मनसेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करत येत्या आठवड्यात सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करू असे आश्वासन दिले. कॅज्युअल लेबर यांच्या प्रतिनिधींना उद्याच बेस्ट भवनामध्ये बोलावून त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू असे देखील आश्वासन दिले.

अविनाश जाधव यांच्यासह 12 कार्यकर्त्यांची सुटका

मुलुंड टोलनाका (Mulund Toll) तोडफोडप्रकरणी मनसे (MNS) कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली आहे. अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्यासह 12 कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली आहे.  पोलिसांकडून सुटका झाल्यानंतर अविनाश जाधव यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेण्यासाठी मनसे तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता गांधीगिरी आंदोलन केले मात्र यापुढे आता गांधीगिरी आंदोलन होणार नाही, मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा अविनाश जाधव यांनी  दिला आहे.

अविनाश जाधव यांच्यासह दहा ते बारा कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर नवघर पोलीस ठाण्यात बाळा नांदगावकर ,संदीप देशपांडे, अभिजीत पानसे,रिटाताई गुप्ता यांनी पोलीस ठाण्यात पोलिसांशी संवाद साधत कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. राज ठाकरे यांचे विधीतज्ञ मुंबई उच्च न्यायालयाचे वकील राजन शिरोडकर यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची जामीन प्रक्रिया पूर्ण करून कार्यकर्त्यांची सुटका केली आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget