मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांचा जामीन अर्ज ठाणे सेशन कोर्टाने फेटाळला
गजानन काळेेना जामीन दिल्यास जातीय तेड निर्माण होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी कोर्टात स्पष्टीकरण दिलं. सर्व मुद्दे लक्षात घेत ठाणे सेशन कोर्टाकडून गजानन काळे यांना जामीन देण्यास नकार देण्यात आला आहे.
नवी मुंबई : मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांना मोठा झटका बसला आहे. ठाणे सेशन कोर्टाकडून गजानन काळे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. कोर्टाकडून गजानन काळे यांना जामीन देण्यास नकार देण्यात आला आहे.
आपल्या जीवाला धोका आहे. गजानन काळे यांचे सरकारी गुंड प्रवृत्तीचे आहेत. मला धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुलाची साक्ष अजून पोलिसांनी नोंदवली नाही. या मुद्द्यांवर जामीन नाकारावा अशी संजीवनी काळे यांनी कोर्टात साक्ष दिली.
गजानन काळे यांना जामीन दिल्यास जातीय तेड निर्माण होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी कोर्टात स्पष्टीकरण दिलं. सर्व मुद्दे लक्षात घेत ठाणे सेशन कोर्टाकडून गजानन काळे यांना जामीन देण्यास नकार देण्यात आला आहे.
आता राज ठाकरेच मला न्याय देतील; गजानन काळेंच्या पत्नी संजिवनी काळेंनी 'कृष्णकुंज'वर मांडली व्यथा
नवी मुंबई मनसे शहराध्यक्ष गजानन काळेंवर त्यांच्या पत्नी संजिवनी काळे यांनी शारीरिक आणि मानसिक छळवणूक करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी आरोप केले आहेत. त्यांच्या तक्रारीवरुन गजानन काळे यांच्याविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा आणि कौटुंबिक अत्याचार या कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
काही दिवसांपूर्वी संजिवनी यांनी शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली होती. शर्मिला ठाकरे यांची भेट झाल्यानंतर संजिवनी काळे यांनी म्हटलं होतं की, , "आपण आपली व्यथा शर्मिला ठाकरे यांच्यासमोर मांडली आहे. त्यांनी माझे सर्व ऐकून घेतलं. राज साहेब आज रात्री येतील, त्यांच्याशी चर्चा करुन मला न्याय मिळवून देण्याचा विश्वास दिला."
संजिवनी काळे यांचे गंभीर आरोप
गजानन काळे यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा फायदा उचलून मोठ्या प्रमाणात काळी माया गोळा केली आहे. शिक्षण प्रवेश आणि मनपा अधिकाऱ्यांना धाक दाखवून करोडो रुपये गजानन काळे यांनी गोळा केले. याबाबत तपास होणार असेल तर आपण यंत्रणेला सगळी माहिती देण्यास तयार आहोत असे पत्नी संजिवनी काळे यांनी सांगितलं होतं. घरात जास्त दिवस रोकड न ठेवता अन्य व्यक्तीच्या नावावर सर्व रोकड बँकेत जमा करायचा. ही रोकड घेऊन येणाऱ्या चार कार्यकर्त्यांची नावेही त्यांनी सांगितली आहेत. लाखो रुपये गोळा करून हे कार्यकर्ते घरी यायचे. एबी नावाच्या बोगस कंपनीच्या नावाने सर्व आर्थिक व्यवहार करण्यात आले आहेत. सदनिका, चार चाकी वाहने, मोबाईल अशा सर्व गोष्टींचे व्यवहार याच कंपनीच्या नावावर करण्यात आल्याचा गौप्यस्फोट संजीवनी यांनी केल्याने गजानन काळे यांच्या अडचणीत भर पडली आहे.