भाजपाच्या गुंडाना मुख्यमंत्र्यांनी आवरावं, नाहीतर आमचीही वेळ येईल : बाळा नांदगावकर
दरम्यान सहा महिन्यांपूर्वी अशाच पद्धतीने खारघर येथील भाजपा नगरसेवकाने हॉटेल मालकावर गुंडांना घेवून हल्ला केला होता. त्यामुळे पनवेलमध्ये भाजपाची गुंडगिरी वाढली असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
नवी मुंबई : पनवेल महानगर पालिकेतील भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी काल मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यानंतर मनसेने भाजपला आपल्या भाषेत इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या गुंडांना आवरावे, अन्यथा आमची वेळ येईल, असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर दिला आहे.
बाळा नांदगावकर यांनी प्रशांत जाधव यांची आज रुग्णालयात जाऊन भेट घेतली. सरकारने याप्रकरणाची तातडीने दखल घेण्याची गरज आहे. आम्ही दखल घेतली तर संघर्ष वाढू शकतो, असा इशारा त्यांनी यावेळी दिली. पोलिसांना आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावून संबधित गुंडांवर कारवाई करावी. तसेच सरकारने यामध्ये कोणताही हस्तक्षेप यामध्ये करु नये आणि सरकार योग्य कारवाई करेल अशी अपेक्षा बाळा नांदगावकरांनी व्यक्त केली.
सरकार जर अशा गुंडगिरीला पाठिंबा देत असेल, तर गुंडगिरीला लोक गुंडगिरीने उत्तर देतात, असा इतिहास आहे. परिस्थिती अशीच राहिली तर संघर्ष वाढतो, असंही बाळा नांदगावकर म्हणाले.
दरम्यान सहा महिन्यांपूर्वी अशाच पद्धतीने खारघर येथील भाजपा नगरसेवकाने हॉटेल मालकावर गुंडांना घेवून हल्ला केला होता. त्यामुळे पनवेलमध्ये भाजपाची गुंडगिरी वाढली असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
पनवेल महापालिकेतील भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी 29 एप्रिल रोजी मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला होता. या हल्ल्यात प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले आहेत. पनवेल मनपा निवडणुकीत नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले होते. मनसे कार्यकर्ता प्रशांत जाधव यांनी आपले पैसे पकडून दिल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचं समजतंय. कामोठे पोलिस स्टेशनमध्ये मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.